लसणीचे लोणचे - Lasun Lonche

Garlic Pickle in English वेळ: ५ ते १० मिनिटे साहित्य: १/२ कप लसणीच्या पाकळ्या (सोलून लहान तुकडे करावेत) दिड ते दोन टेस्पून कैरी लोणचे...

Garlic Pickle in English

वेळ: ५ ते १० मिनिटे


साहित्य:
१/२ कप लसणीच्या पाकळ्या (सोलून लहान तुकडे करावेत)
दिड ते दोन टेस्पून कैरी लोणचे मसाला
फोडणीसाठी: ३ टेस्पून तेल, १/२ टिस्पून मोहोरी, १/२ टिस्पून हिंग, १/४ टिस्पून हळद
१/२ टिस्पून काश्मिरी लाल तिखट (रंगासाठी)
३ टेस्पून लिंबाचा रस
चवीपुरते मीठ

कृती:
१) एका लहान वाडग्यात चिरलेल्या लसूण पाकळ्या आणि १/२ ते १ टिस्पून मीठ घालून छान मिक्स करून ठेवावे. साधारण ३० मिनिटे खारवून ठेवावे.
२) फोडणी तयार करण्यासाठी कढल्यात तेल गरम करावे. मोहोरी घालून तडतडली कि हिंग आणि हळद घालावी. एका वाटीत ही फोडणी काढून ठेवावी.
३) ३० मिनिटांनी लोणचे मसाला लसणीच्या खारवलेल्या तुकड्यांत मिक्स करावा. त्यात लिंबाचा रस, काश्मिरी लाल तिखट आणि गार झालेली फोडणी घालून मिक्स करावे.
४) नीट मिक्स करून चव पहावी. लागल्यास थोडे मीठ घालावे.

टीपा:
१) तेलाचे आणि लोणचे मसाल्याचे प्रमाण कमी जास्त करू शकतो.
२) लसणीबरोबर थोडा आल्याचा किस किंवा ओल्या हळदीचा किस घालून शकतो.

Related

Pickle / Preserve 6942239916509007949

Post a Comment Default Comments

item