शेपूची भाजी - Shepuchi Bhaji

Shepu Bhaji in English वेळ: १०-१५ मिनिटे वाढणी: २ ते ३ जणांसाठी साहित्य: १ मोठी जुडी शेपू २-३ हिरव्या मिरच्या फोडणीसाठी: २ टिस्पून...

Shepu Bhaji in English

वेळ: १०-१५ मिनिटे
वाढणी: २ ते ३ जणांसाठी

साहित्य:
१ मोठी जुडी शेपू
२-३ हिरव्या मिरच्या
फोडणीसाठी: २ टिस्पून तेल, १/४ टिस्पून मोहोरी, १/४ टिस्पून हळद, ५-६ मेथीदाणे
८-९ लसणीच्या पाकळ्या, ठेचून
१/४ कप भिजवलेले शेंगदाणे
२ टेस्पून भिजवलेली तूर डाळ
१/२ ते ३/४ कप थालीपीठाची भाजणी
२ टिस्पून गूळ (ऐच्छिक)
चवीपुरते मीठ

कृती:
१) शेपू निवडून घ्यावा. खोल भांड्यात पाणी घ्यावे व स्वच्छ करावा. नंतर चिरून घ्यावा.
२) कुकरच्या डब्यात शेपू व मिरच्या मोडून घालाव्यात. कुकरमध्ये २-३ शिट्ट्या करून भाजी शिजवावी. भाजीच्या डब्यावर झाकण ठेवून त्यावर भिजवलेले शेंगदाणे ठेवून तेही शिजवून घ्यावे.
३) कढईत तेल गरम करावे. त्यात लसूण घालावी. लालसर होईस्तोवर परतावे. मेथीदाणे घालून गुलाबी रंग येईस्तोवर परतावे. नंतर मोहोरी आणि हळद घालून फोडणी करावी.
४) फोडणीत भिजवलेली तूरडाळ घालून मंद आचेवर वाफ काढावी. डाळ अर्धवट शिजली कि शिजवलेले शेंगदाणे घालावेत. मिनिटभर परतावेत.
५) यात शिजवलेली शेपूची भाजी घालून नीट मिक्स करून घ्यावे. मंद आचेवर झाकण ठेवून मिनिटभर शिजवावे.
६) नंतर थालीपीठाची भाजणी पेरून मिक्स करावे. चवीनुसार मीठ आणि गुळ घालावा. झाकण ठेवून २ वाफा येउ द्याव्यात.
भाजी गरमच भाकरी किंवा पोळीबरोबर सर्व्ह करावी.

टीप:
१) भाजणीऐवजी ज्वारीचे पीठ किंवा भाजलेले बेसनही वापरू शकतो. भाजणीमुळे चव छान येते.

स्त्रोत: आमच्या साठे आज्जी.

Related

Marathi 7909428960847205758

Post a Comment Default Comments

  1. Mast recepir ahai...aajach try karatai....Thanks.....
    .
    .


    ReplyDelete
  2. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  3. Hi tai
    Without shegdane nahi karta yenar ka hi bhaji

    ReplyDelete
  4. sorry this might be a stupid Q but tumhi shepu nivadta mhnaje kay discard karta? do you take only the tender leaves and throw away the rest?

    ReplyDelete
    Replies
    1. Ho pane ghyaychi.. jaad dethi astat tya takun dyaychya.

      Delete
  5. sorry this might be a stupid Q but tumhi shepu nivadta mhnaje kay discard karta? do you take only the tender leaves and throw away the rest?

    ReplyDelete

item