भरलेले पडवळ - Bharlele padwal

Stuffed Padwal in English वेळ: ४० मिनिटे २ ते ३ जणांसाठी साहित्य: १/४ किलो पडवळ (कोवळे) फोडणीसाठी - १ टेस्पून तेल, चिमुटभर जीरे, १/...

Stuffed Padwal in English

वेळ: ४० मिनिटे
२ ते ३ जणांसाठी


साहित्य:
१/४ किलो पडवळ (कोवळे)
फोडणीसाठी - १ टेस्पून तेल, चिमुटभर जीरे, १/४ टिस्पून हळद, १/४ टिस्पून लाल तिखट
सारण:
३/४ कप ताजा नारळ
५ टेस्पून बेसन
२ टेस्पून शेंगदाण्याचा कूट
१/२ टिस्पून लाल तिखट
१/४ टिस्पून हळद
१/४ टिस्पून हिंग
१/२ टिस्पून जिरेपूड
१ टिस्पून धणेपूड
१/२ टिस्पून आमचूर पावडर (ऐवजी लिंबाचा रस किंवा चिंचेचा कोळ वापरू शकता)
१/२ टिस्पून ओवा
१/२ टिस्पून जीरे
१/२ टिस्पून तीळ
२ टिस्पून साखर
३-४ टेस्पून तेल
चवीपुरते मीठ

कृती:
१) पडवळाचे १ इंचाचे तुकडे करावे. आतील भाग चमच्याच्या मागील बाजूने कोरून काढावा. थोडेसे मीठ चोळावे. साधारण ७० % शिजतील इतपत वाफवून घ्यावे. पाणी काढून वाफवलेले तुकडे चाळणीत काढून १५ मिनिटे वाऱ्यावर ठेवावे.
२) बेसन कोरडेच भाजून घ्यावे. एका वाडग्यात काढावे. त्यात शेंगदाणा कूट, नारळ, लाल तिखट, हळद, हिंग, जिरेपूड, धणेपूड, आमचूर पावडर, ओवा, जीरे, तीळ, साखर आणि चवीपुरते मीठ असे घालून मिक्स करावे. हे मिश्रण पडवळाच्या तुकड्यात भरावे.
३) एका फ्राइंग पॅनमध्ये तेल गरम करावे. त्यावर भरलेले पडवळ ठेवावे. मंद आचेवर झाकण ठेवून शिजू द्यावे. हलक्या हाताने बाजू पलटावी. जर अजून तेल हवे असल्यास कडेने थोडेसे तेल सोडावे.
पडवळ नीट शिजले कि पोळीबरोबर सर्व्ह करावे.

टीप:
१) पडवळ शिजताना मधल्या सरणावर २-३ थेंब तेल घातल्यास सारण शिजायला मदत होते.

Related

Snake Gourd 6437622581854565699

Post a Comment Default Comments

Post a Comment

emo-but-icon

item