मेथीचे पिठले - Methiche Pithale

Methi Pithle in English वेळ: १० मिनिटे वाढणी: २ जणांसाठी साहित्य: १/२ कप बारीक चिरलेली मेथी ४ ते ५ टेस्पून बेसन (गरजेनुसार कमी जास्त ...

Methi Pithle in English

वेळ: १० मिनिटे
वाढणी: २ जणांसाठी

साहित्य:
१/२ कप बारीक चिरलेली मेथी
४ ते ५ टेस्पून बेसन (गरजेनुसार कमी जास्त करावे)
फोडणीसाठी: २ टीस्पून तेल, मोहोरी, १/८ टीस्पून हिंग, १/४ टीस्पून हळद, २ ते ३ हिरव्या मिरच्या, ४ पाने कढीपत्ता
४ मोठ्या लसणीच्या पाकळ्या, जाडसर चिरून
२-३ आमसुलं
चवीपुरते मीठ

कृती:
१) कढईत तेल गरम करावे. त्यात लसूण फोडणीला घालावी. रंग थोडा लालसर झाला कि मोहोरी, हिंग, हळद, कढीपत्ता आणि मिरच्या घालाव्यात. नंतर चिरलेली मेथी घालावी. थोडेसे मीठ घालावे. झाकण ठेवून मध्यम आचेवर मेथी साधारण ५ ते ७ मिनिटे शिजू द्यावी. जर मेथी कोरडी झाली तर थोडे पाणी घालावे.
२) मेथी शिजली कि त्यात साधारण अडीच कप पाणी घालावे. त्यात आमसुलं घालावीत.
३) नंतर १/२ कप पाणी एका भांड्यात घेउन त्यात साधारण ४ चमचे बेसन मिक्स करावे. गुठळ्या राहू देउ नयेत. बेसन पाण्यात कालवून ठेवावे. कढईतील पाण्याला उकळी आली कि कालवलेले बेसन हळूहळू कढईत घालावे आणि ढवळावे म्हणजे गुठळ्या होणार नाहीत. पिठले गरजेइतके दाटसर होईस्तोवर बेसनाचे पाणी घालावे. इनकेस, हे मिश्रण संपले आणि पिठले दाट झाले नसेल तर अजून १-२ चमचे पीठ थोड्याशा पाण्यात कालवून पिठल्यात घालावे.
४) मध्यम आचेवर उकळी येउ द्यावी. पिठले नीट शिजले कि गरम भाताबरोबर सर्व्ह करावे.

टीपा:
१) पिठले घट्टसर बनवले तर भाकरीबरोबर छान लागते. भाकरीबरोबर बनवताना पिठले थोडेसे तिखट बनवावे.
२) बेसनाचे पीठ आधी कोरडे भाजून नंतर पिठल्यात वापरले तर पिठल्याला खमंग स्वाद येतो.

Related

Methi 1936032273131323261

Post a Comment Default Comments

  1. नमस्कार.

    मी गल्फ मध्ये एकटाच असतो. पदार्थ बनवाण्य्ची आवड पहिल्यपसुन पण मांसाहारी . शाकाहारी बनवताना चकली ब्लॉगची अफाट मदत झाली तुमचा काम खरोखरी कौतुकास्पद आहे तुमचा हा ब्लोग असाच चालू राहावा म्हणून शुबेच्छा

    सुधाकर

    ReplyDelete
  2. धन्यवाद सुधाकर

    ReplyDelete
  3. Tumchya Reciprs khup chhan aani karayala Ekdam sopya asatat.
    Thanks

    ReplyDelete
  4. Thanks, aaj nakki banvun result sangen

    ReplyDelete
  5. vaidehi ji .... khupach chhan website .. zakkas ....recipe vachali ki tondala pani yet .... kharach .. he sarv padartha yetat ka ho bavata tumhala ... .... ashchyrya .... eka vyaktila kas shakya ahe ho itake padarth .. ..... aso .... asach update karat raha .... shubhechha tumhala ani salam tumachya recipe la ...

    ReplyDelete
  6. Namaskar santosh ji, sarv recipe mich banavate, ani photosuddha kadhate. practice and awadimule he sahaj shakya aahe. thanks

    ReplyDelete
  7. Hi vaidehi methi evji palak ghatla tr chalel ka?
    Arti

    ReplyDelete
    Replies
    1. actually methila ek sharp flavor asto tyamule he pithle chhan lagte.. Palak ghatla tari harkat nahi.. pan tyamule flavorwise farak padel.

      Delete

item