फणसाची भाजी - Fanasachi Bhaji

Fanasachi Bhaji in English वेळ: पूर्वतयारी ३० मिनिटे | पाकृसाठी: १५ मिनिटे  वाढणी: ६ ते ७ जणांसाठी साहित्य: दीड किलो भाजीचा फणस ३/४ क...


वेळ: पूर्वतयारी ३० मिनिटे | पाकृसाठी: १५ मिनिटे
 वाढणी: ६ ते ७ जणांसाठी


साहित्य:
दीड किलो भाजीचा फणस
३/४ कप ताजे पावट्याचे दाणे किंवा भिजवलेले शेंगदाणे (कुकरमध्ये शिजवून घ्यावे)
फोडणीसाठी: ४ चमचे तेल, १/४ चमचा मोहोरी, १/४ चमचा जिरे, १/४ चमचा हिंग, १/४ चमचा हळद ४ सुक्या लाल मिरच्या
३ टेस्पून गूळ
चवीपुरते मिठ

कृती:
१) फणस चिरून घ्यावा. विळीखाली वर्तमानपत्र पसरावे. तसेच वर्तमानपत्राचे मध्यम आकाराचे तुकडे तयार ठेवावेत. विळीच्या पात्याला आणि हाताला तेल लावून घ्यावे.
२) फणस मधोमध आडवा चिरावा. कागदाच्या तुकड्याने लगेच बाहेर आलेला चिक पुसावा. प्रत्येक अर्ध्या भागाचे ४ भाग करावे. साल काढण्यापूर्वी आतील गऱ्यांच्या वर चिवट पट्टी असते ती नीट काढून टाकावी. ही पट्टी शिजत नाही, त्यामुळे पूर्ण काढून टाकावी. सालाकडचा भाग विळीवर काढून टाकावा. सोललेला तुकडा पाण्यात बुडवून ठेवावा नाहीतर काळा पडतो. अशाप्रकारे सर्व फणस सोलून घ्यावा.
३) सोललेल्या फणसाचे छोटे छोटे तुकडे करावेत. लहान कुकरमध्ये हे तुकडे टाकावेत. तुकडे बुडेल इतपत पाणी घालावे. १/२ चमचा मिठ घालावे. ३ शिट्ट्या करून फणसाचे तुकडे मऊ शिजवून घ्यावे.
४) कढईत तेल गरम करून त्यात मोहोरी, जिरे, हिंग, हळद आणि सुक्या मिरच्या घालून फोडणी करावी. त्यात शिजवलेला फणस आणि शिजवलेले शेंगदाणे फोडणीस टाकावे. वाटल्यास थोडेसेच पाणी आणि तिखट घालावे. गूळ आणि मिठ घालून ५-७ मिनिटे शिजवावे.

Related

Marathi 88561337180445990

Post a Comment Default Comments

  1. Vaidehi, tumcha chakli blog chhan aahe. Ashach nav-navin recipes post karat raha, aani amhi tya karun pahat jau. Thank you.

    Meenakshi Ghodekar.

    ReplyDelete
  2. Hi recipe post kelya baddal thank you! khup chan recipe aahe.. majhya aai ne exact same recipe dili aahe mala.

    ReplyDelete
  3. Thanks vaidehi..tumachya blogvarun me pahun me fanasachi bhaji keli...chan zali...thanks for sharing..

    ReplyDelete
  4. Mazi Aai Fansachya Bhajit Kale Til vatun ghalte.. kanda tomattochi fodani..ahaahaa..

    me try karun baghin navin style chi bhaji

    ReplyDelete
  5. fanas aaj shijavun ghetala n udya bhaji keli tar chalel ka?

    ReplyDelete

item