फ्राईड टोफू करी - Fried Tofu Curry

Fried Tofu Curry in English वेळ: २० ते २५ मिनिटे वाढणी: ३ जणांसाठी साहित्य: १ कप तांदुळाचा मोकळा भात (शक्यतो बासमती) ४०० ग्राम टोफू, ...


वेळ: २० ते २५ मिनिटे
वाढणी: ३ जणांसाठी

साहित्य:
१ कप तांदुळाचा मोकळा भात (शक्यतो बासमती)
४०० ग्राम टोफू, मोठे चौकोनी तुकडे
४ टेस्पून कॉर्न फ्लोअर
१/२ टिस्पून मिठ
करीसाठी
२ टिस्पून सोया सॉस
१ टिस्पून व्हिनेगर
दीड टेस्पून बारीक चिरलेला लसूण
१ टेस्पून बारीक चिरलेले आले
१ मध्यम कांदा उभा पातळ चिरून
२ टेस्पून कॉर्न फ्लोअर
२ कप पाणी
२ लाल मिरच्या बारीक चिरून
२ टिस्पून ब्राऊन शुगर
चवीपुरते मिठ
४ ते ६ टेस्पून तेल
२ पाती कांद्याच्या काड्या, उभट चिरून

कृती:
१) टोफू स्वच्छ टॉवेलमध्ये गुंडाळून हलक्या हाताने चेपावा म्हणजे त्यातील पाण्याचा अंश कमी होईल. कॉर्न फ्लोअरमध्ये मिठ घालून यात टोफूचे तुकडे घालावे. कॉर्न फ्लोअरने टोफूचे तुकडे छान कोट झाले पाहिजेत.
२) ५ मिनिटे टोफू तसाच ठेवून परत कॉर्न फ्लोअरमध्ये घोळवावे. तेल गरम करून त्यात टोफू शालो फ्राय करून घ्यावा. टोफू थोडा लालसर झाला की पेपर टॉवेलवर काढून ठेवावा.
३) त्याच तेलात लसूण, आले, मिरची आणि कांदा घालून मिनिटभर परतावे. सोया सॉस घालावा. कॉर्न फ्लोअर, ब्राऊन शुगर आणि पाणी एकत्र करून कढईत घालावे. जर अजून घट्टपण हवा असेल तर १ चमचा कॉर्न फ्लोअर थोड्याशा पाण्यात मिक्स करून घालावे. व्हिनेगर आणि चवीपुरते मिठ घालावे.
४) करी थोडी घट्ट झाली की त्यात तळलेला टोफू घालावा. छान मिक्स करावे.
भात प्लेटमध्ये वाढून त्यावर करी आणि टोफू असे घालावे.

टीप:
१) ब्राउन शुगर अगदीच नाही मिळाली तर थोडी साधी साखर आणि थोडेसे मध घालावे.

Nutritional Info: Per serving (considering 3 servings)
Calories: 673| Carbs: 73 g | Fat: 28 g | Protein: 1 g | Sat. Fat: 3 g | Sugar: 5 g

Related

Tofu 492117844560099499

Post a Comment Default Comments

  1. tofu kay aahet?
    aani te chotya shaharat miltat kay?

    ReplyDelete
  2. tofu kay aahet?
    aani te chotya shaharat milatil kay?

    ReplyDelete
  3. Tofu mhanje Soyabean pasun banavlela paneersarkha padarth asto.
    Chotya shaharat milu shakel ka he nakki sangu shakat nahi. general stores madhye chaukashi karun paha.

    ReplyDelete
  4. Yevdhe hyfy jevan nahi karta yenar mala....

    ReplyDelete
  5. Yevdhe hyfy jevan nahi karta yenar mala.,

    ReplyDelete
  6. TOFU means SOYA PANEER.... Is it...? pls confirm... Relaince fresh madhe tech available aahe... Kay karu.... te vaparun try karu ka hi recipe

    ReplyDelete
  7. Hi Pallavi

    ho tofu mhanjech soya paneer. reliance fresh madhye milte te vaparles tari chalel.

    ReplyDelete
  8. Hi
    tumchya saglya receipee khup chhan aahet .....Thanks

    ReplyDelete

item