मटार कोफ्ता करी - Matar Kofta Curry

Matar Kofta Curry in English वेळ: पूर्वतयारी - ३० मिनिटे | कृतीसाठी : ४० मिनिटे वाढणी: ४ जणांसाठी साहित्य: १ कप मटार १ लहान कांदा, बा...


वेळ: पूर्वतयारी - ३० मिनिटे | कृतीसाठी : ४० मिनिटे
वाढणी: ४ जणांसाठी


साहित्य:
१ कप मटार
१ लहान कांदा, बारीक चिरून
१ टीस्पून आले पेस्ट
१ टीस्पून मिरची पेस्ट
१/२ टीस्पून जिरे
१/४ कप कोथिंबीर
४ ते ५ टेस्पून बेसन
१/४ कप बेदाणे
चवीपुरते मीठ
१ कप तेल कोफ्ते तळण्यासाठी
::::करीसाठी::::
२ मध्यम कांदे
२ मोठे टॉमेटो
५ ते ६ लसूण पाकळ्या, एकदम बारीक चिरून
१ लहान तुकडा आले, बारीक चिरून
८ ते १० काजू
१ टीस्पून लाल तिखट (करी तिखट हवी असल्यास अजून थोडे घालावे)
१ टीस्पून कसूरी मेथी
४ टेस्पून तेल (टीप १ नक्की वाचा)
अख्खा गरम मसाला - १ तमाल पत्र, २ वेलची, १ इंच दालचीनी, २-३ काळी मिरी, २ लवंग
१ टीस्पून गरम मसाला
१ टेस्पून धणेपूड
१ टीस्पून जिरेपूड
३ टेस्पून क्रीम / फेटलेली साय
२ टीस्पून साखर (ऐच्छिक)
चवीपुरते मीठ

कृती:
कोफ्ते:
१) बेसन भाजून घ्यावे. मटार भरडसर वाटून घ्यावे. वाटलेल्या मटारात चिरलेला कांदा, कोथिंबीर, जिरे, आले-मिरची पेस्ट आणि चवीपुरते मीठ घालून मिक्स करावे. भाजलेले बेसन घालून मऊ गोळा भिजवावा.
२) भिजवलेला गोळा १० समान भागात विभागून घ्यावा. एका भाग हातात घेउन चपटा करावा. मध्यभागी थोडे बेदाणे ठेवावे. सर्व बाजू बंद करून कोफ्ता बनवावा. शक्यतो चपटे कोफ्ते बनवावे म्हणजे आतपर्यंत शिजतील. अशाप्रकारे सर्व कोफ्ते बनवून घ्यावे.
३) कढईत तेल गरम करावे. तेल गरम झाले की आच मंद करावी. एकावेळी ३ कोफ्ते घालून तळून घ्यावे.
करी:
४) कांद्याचे मोठे तुकडे करून मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यावे. किंवा किसणीवर किसावे.
५) टॉमेटो उकळत्या पाण्यात घालावे. ३-४ मिनिटे उकळवावे. साले काढून मिक्सरमध्ये वाटावे. काजूसुद्धा ५ मिनिटे उकळवून घ्यावे व अगदी थोडे पाणी वापरून पेस्ट करून घ्यावी.
६) कढईत ३-४ टेस्पून तेल गरम करावे. त्यात अख्खा गरम मसाला घालावा. आलेलसूण घालावे. काही सेकंद परतून कांदा पेस्ट घालावी. मध्यम आचेवर कांदापेस्ट लालसर होईस्तोवर आणि तेल सुटेपर्यंत परतावे. कांदा पेस्ट व्यवस्थित परतली गेली पाहिजे. जर थोडीपण कच्चट राहिली तर ग्रेव्हीला उग्र दर्प येतो आणि चवीला जळजळीत लागते. कांदापेस्ट परतल्यावर त्यातील तमालपत्र आणि दालचीनी काढून टाकावी.
७) टॉमेटो प्युरी आणि काजू पेस्ट घालावी. झाकण ठेवून मंद आचेवर शिजवावे. मध्येमध्ये तळापासून ढवळावे. टॉमेटोचा कच्चा वास जाईस्तोवर झाकण ठेवून शिजवावे. कडेने तेल सुटले की थोडे पाणी घालून कंसिस्टन्सी सारखी करावी.
८) शेवटी लाल तिखट, कसूरी मेथी, गरम मसाला पावडर, धने-जिरेपूड, साखर आणि मीठ घालावे. २ मिनिटे उकळून घ्यावे.
क्रीम घालून मिक्स करावे. आच मंद करून कोफ्ते घालावे. २ मिनिटे झाकून ठेवावे. गॅस बंद करावा.
गरमागरम कोफ्ता करी नान, रोटी किंवा प्लेन पराठ्याबरोबर सर्व्ह करा.

टीपा:
१) तळणीतील उरलेल्या तेलापैकीच ४ चमचे तेल करीसाठी वापरले तरी चालेल.
२) ग्रेव्हीला थोडे जास्त तेल लागते. कमी तेलावर ग्रेव्ही केल्यास चव चांगली येत नाही.
३) सकाळी कोफ्ता करी बनवून संध्याकाळी खाल्ल्यास अधिक चविष्ट लागते कारण कोफ्त्यामध्ये करी मुरते.
४) कोफ्त्यामध्ये वेगवेगळे स्टफिंग घालू शकतो. वेगवेगळी ड्रायफ्रुट्स (काजू पिस्ता बेदाणे जर्दाळू इत्यादी), किसलेले चीज, खवलेला नारळ आणि थोडे बेदाणे.

Related

Peas 2315973662778050911

Post a Comment Default Comments

  1. khupach chan .mi gelya 2 varshapasun tumcha bolg vachat aahe. vishesh mhanje sarv recipies pure veg aahet.

    ReplyDelete
  2. Vaids, I tried it w/o 'Akkha Garam Masala'. It still tasted Yum!!!!

    ReplyDelete
  3. chan ahe i will try vaidhehi

    ReplyDelete
  4. Me hi recipe try karun pahili ghari..Sarvana faar aavdali..Thanks Vaidehi :)

    ReplyDelete
  5. Khup chan ahe receipy me aaj ghari try karnar ahe.

    ReplyDelete
  6. Cream must ahe ka

    ReplyDelete
  7. Vaidehi,

    Could u suggest replacement for cashews and cream please. My daughter has nut and milk allergy.

    Thanks,
    Bhairavee Bhave Sant.

    ReplyDelete

item