ग्वाकामोले बर्गर - Guacamole Veg Burger
Guacamole Burger in English वेळ: २५ मिनिटे वाढणी: ८ जणांसाठी साहित्य: ८ बर्गर बन्स १ कप ग्वाकामोले ८ बर्गर पॅटीज् ८ चीज स्लाईसे...

वेळ: २५ मिनिटे
वाढणी: ८ जणांसाठी
साहित्य:
८ बर्गर बन्स
१ कप ग्वाकामोले
८ बर्गर पॅटीज्
८ चीज स्लाईसेस (मी प्रोवोलोन चीज वापरले होते)
२-३ मध्यम टॉमेटो
२ मध्यम कांदे
४ लेट्यूसची पाने (अर्धी करून)
मीठ आणि मिरपूड चवीप्रमाणे
२ टेस्पून बटर
कृती:
१) टॉमेटो आणि कांदे कापून गोल पातळ चकत्या कराव्यात.
२) चीज स्लाईसेस प्रत्येक पॅटीवर ठेवावे. जर तुमच्याकडे ग्रील असेल किंवा मायक्रोवेव्हमध्ये ग्रीलचा पर्याय असेल तर चीज वितळेस्तोवर ग्रील करावे.
ग्रील नसल्यास नॉनस्टीक पॅनमध्ये थोडे तेल किंवा बटर घालावे. त्यात चीज ठेवलेले पॅटीज ठेवून वर झाकण ठेवावे. मंद आचेवर चीज मेल्ट होवू द्यावे.
३) आता बर्गर असेंबल करावे. बनचा खालचा अर्धा भाग सर्विंग प्लेटमध्ये ठेवावा. आता चीज वितळलेली पॅटी ठेवावी. त्यावर लेट्यूस, कांदा, आणि टॉमेटो ठेवावा. थोडे मीठ मिरपूड पेरावे. वर चमचाभर ग्वाकामोले ठेवावे. बर्गर बनच्या उरलेल्या अर्ध्या भागावर थोडे मेयॉनीज लावावे व तो वर ठेवून बर्गर तयार करावे. बर्गर सर्व्ह करावे.
बर्गर बटाटा चिप्स किंवा फ्राईज बरोबर सर्व्ह करावे.
टीपा:
१) ग्वाकामोले हे आवोकाडो या फळापासून बनवतात. हे फळ भारतात फारसे आढळत नाही. त्यामुळे ग्वाकामोले नसले तरी व्हेज आलू पॅटी बर्गरबनवू शकतो.
२) प्रोवोलोन चीजऐवजी अमूल चीज स्लाईसेस, किंवा चेडार चीज वापरू शकतो.