कॉर्न पॅटीस - Corn Patties

Corn Patties in English वेळ: ३५ ते ४० मिनिटे वाढणी: ४ ते ५ जणांसाठी (२० मध्यम ) साहित्य: २ कप स्वीट कॉर्न, उकडलेले ३ मध्यम बटाटे, उकड...


वेळ: ३५ ते ४० मिनिटे
वाढणी: ४ ते ५ जणांसाठी (२० मध्यम )


साहित्य:
२ कप स्वीट कॉर्न, उकडलेले
३ मध्यम बटाटे, उकडलेले
२ ब्रेडचे स्लाईस
१ टीस्पून आले, किसलेले
३ हिरव्या मिरच्या, पेस्ट करून
२ लहान कांदे (ऐच्छिक)
१/२ टीस्पून जिरे
१/४ कप कोथिंबीर, बारीक चिरून
कॉर्न फ्लेक्स, क्रश केलेले (खालील टीपा नक्की वाचा)
१ टेस्पून मैदा + १/२ कप पाणी
चवीपुरते मीठ
तळण्यासाठी तेल

कृती:
१) बटाटे सोलून कुस्करून घ्यावे. ब्रेडचे तुकडे मिक्सरमध्ये बारीक करावे आणि ते बटाट्यात घालावे.
२) दीड कप कॉर्न मिक्सरमध्ये अगदी भरड वाटावेत. उरलेले १/२ कप कॉर्न अख्खेच मिक्स करावेत. कांदा बारीक चिरून घ्यावा.
३) कॉर्नच्या मिश्रणात कुस्करलेले बटाटे, ब्रेडचा चुरा, मिरची पेस्ट, आले, जिरे, कोथिंबीर, चिरलेला कांदा, आणि मीठ घालावे. मिक्स करून घ्यावे.
४) तयार मिश्रणाचे १८ ते २० मध्यम आकाराचे पॅटीस बनवावे. पॅटीस गोल आणि चपटे  बनवावेत.
५) क्रश केलेले कॉर्न फ्लेक्स एका ताटलीत पसरवून ठेवावे.
६) मैदा आणि पाणी यांचे मिश्रण एकदा ढवळून घ्यावे. यात ३-४ पॅटीस बुडवून लगेच बाहेर काढावेत. आणि कॉर्न फ्लेक्सवर ठेवावेत. दोन्ही बाजूंनी कॉर्न फ्लेक्स चिकटतील याची काळजी घ्यावी. अशाप्रकारे सर्व पॅटीस बनवावेत. पॅटीस एकावर-एक रचू नयेत. सेपरेट ठेवावीत. अर्धा-पाऊण तास फ्रीजमध्ये ठेवावे.
७) अर्ध्या तासाने पॅटीस फ्रीजमधून बाहेर काढून १० मिनिटे बाहेर ठेवावे.
८) कढईत तेल गरम करून मिडीयम आचेवर पॅटीस तळून घ्यावी. जेव्हा पॅटीस तळणीत सोडाल तेव्हा २०-२५ सेकंद त्याला डिस्टर्ब करू नकात. एक बाजू थोडी तळली गेली की मगच झाऱ्याने बाजू बदलावी. दोन्ही बाजू सोनेरी रंगावर तळाव्यात.
९) तळलेले पॅटीस टिश्यू पेपरवर काढावेत.
पुदिना चटणी किंवा टॉमेटो केचपबरोबर सर्व्ह करावेत.

टिप्स:
१) कॉर्न फ्लेक्स वापरताना प्लेन कॉर्न फ्लेक्स वापरावेत. (मी केलॉग ओरिजिनल वापरले होते.)
२) कॉर्न फ्लेक्समुळे पॅटीस बाहेरून एकदम कुरकुरीत होतात. कॉर्न फ्लेक्सऐवजी भाजलेला जाड रवा किंवा ब्रेड क्रम्स वापरू शकतो.
३) कॉर्न फ्लेक्स वापरणार असाल तर सर्व्ह करायच्या आधी पॅटीस पेपर टॉवेलवर ठेवा, कारण कॉर्न फ्लेक्स तेल शोषून घेतात.
४) हे पॅटीस शालो फ्रायसुद्धा करू शकतो. त्यावेळी मात्र रवा किंवा ब्रेड क्रम्सच वापरावे.
५)  तळणीसाठी तयार केलेले पॅटीस फ्रीजमध्ये ठेवल्याने ते छान सेट होतात. तसेच बाहेरील कोटिंग नीट चिकटून राहते व तेलात कमी उतरते.
६) अशाप्रकारे पॅटीस तयार करून फ्रीजमध्ये तयार करून ठेवू शकतो. पाहुणे यायच्या आधी १५ मिनिटे बाहेर काढून मग तळावेत.

Related

Snack 5527530413112360911

Post a Comment Default Comments

  1. tandalachha (korade) pithat pattice gholavun shaollow fry kara.

    ReplyDelete

item