आलू बर्गर पॅटीज् - Aloo Patties for Burger
Aloo Burger Patties in English वेळ: २५ मिनिटे ८ बर्गर पॅटीज् साहित्य: ३ मोठे बटाटे (उकडून सोलून मॅश केलेले) ३/४ कप मटार, वाफवलेले १ ...
https://chakali.blogspot.com/2013/02/aloo-veg-patties-for-burger.html?m=1
Aloo Burger Patties in English
वेळ: २५ मिनिटे
८ बर्गर पॅटीज्
साहित्य:
३ मोठे बटाटे (उकडून सोलून मॅश केलेले)
३/४ कप मटार, वाफवलेले
१ मध्यम गाजर, किसलेले
२ टीस्पून लसूण पेस्ट
१ टीस्पून हिरवी मिरची पेस्ट
१/२ टीस्पून आलं (ऐच्छिक)
१/२ टीस्पून गरम मसाला
१/४ कप ब्रेड क्रम्ज
२ टीस्पून तेल
चवीपुरते मीठ
अजून थोडे तेल / बटर पॅटीज् रोस्ट करण्यासाठी
कृती:
१) कढईत तेल गरम करावे. आले-लसूण पेस्ट आणि मिरची पेस्ट घालावी. काही सेकंद परतावे.
२) मटार आणि गाजर घालून १-२ मिनिटे मंद आचेवर वाफ काढावी. बटाटे, ब्रेड क्रम्ज आणि मीठ घालून मिक्स करावे. झाकण ठेवून २-३ मिनिटे वाफवावे. शेवटी गरम मसाला घालून मिक्स करावे.
३) मिश्रण थंड होवू द्यावे. मिश्रणाचे ८ समान भाग करावे. त्याच्या चपट्या पॅटीज् बनवाव्यात. नॉनस्टीक तव्यावर थोडे तेल घालून कमी आचेवर भाजाव्यात. आच मंद असावी. दोन्ही बाजू लालसर आणि थोड्या कुरकुरीत करून घ्याव्यात.
या पॅटीज वापरून बर्गर बनवू शकतो. तसेच या पॅटीज् नुसत्या खायलाही छान लागतात. त्यांबरोबर टॉमेटो केचप किंवा हिरवी चटणी सर्व्ह करावी.
टीपा:
१) ब्रेड क्रम्ज खूप जास्त घालू नये. त्यामुळे पॅटीज् हलके न होता घट्ट होतात. फक्त बाइंड करण्यापुरतेच ब्रेड क्रम्ज वापरावे.
२) यामध्ये जिरेपूड, चाट मसाला वगैरे घालून आवडीनुसार फ्लेवर द्यावेत.

very tasty!!
ReplyDeleteआपले लेखन आवडले..!! यासाठी माझ्याकडून सुपर लाईक..!!
ReplyDeleteInfoBulb : Knowledge Is Supreme
vaidehi di,
ReplyDeleteThank you for this recipe.kalch karun pahile sarvana khupch awadle. tuzya hya recipes me nehami follow karate tyamule me banvalelya jevnachi nehami tarif hot asate. Thank you di hya sarva receipes sathi ashach chhan recipes amhala det ja. khakara kasa banvacha he pan jara sang na pls. ani mala methi muthiya pan nahi jamlya tya khup kadu ani atun kachat zalya ka te pan sang
-sayee
khakara recipe post karen. methi muthia che pith ekdum ghatta bhijavu naye. madhyam achevar talayche. tasech mothe muthia banavu nayet.
ReplyDeleteHi Vaidehi,
ReplyDeleteme aaj sakali breakfast sathi he patis kele hote, khup chaan zale ani chav dekhil chan zali, maza 2.5 yrs cha mulga jo nehami khanyache talat asto, tyane hi mothya avadine 2 patis fast kele, tyane khallymule mala pan kharach khup chaan watle, saglyani kautuk hi kela. thanks to you.
Regards
vaishali
Thanks Vaishali
ReplyDeleteNEW LOOK IS VERY GOOD
ReplyDeleteThanks
Deletewah surekh
ReplyDeleteHi Vaidehi
ReplyDeleteu r great. Chakali navach tumch ek recipe book kadha.