पालक शंकरपाळे - Palak Shankarpale

Palak Shankarpale in English वेळ: ३० मिनिटे वाढणी: ४ जणांसाठी साहित्य: ३/४ कप मैदा ३ टेस्पून पालकाची प्युरी १ टीस्पून हिरव्या मिरची...

Palak Shankarpale in English

वेळ: ३० मिनिटे
वाढणी: ४ जणांसाठी

साहित्य:
३/४ कप मैदा
३ टेस्पून पालकाची प्युरी
१ टीस्पून हिरव्या मिरचीची पेस्ट
२ टेस्पून गरम तेल
१ टीस्पून जिरे, भरडसर कुटलेले
१/२ टीस्पून मिरपूड, भरड
१/२ टीस्पून ओवा, भरडसर कुटलेला
चवीपुरते मीठ
शंकरपाळे तळायला तेल

कृती:
१) मैदा एका वाडग्यात मैदा घ्यावा. त्यात कडकडीत तेल घालावे. त्यात जिरे, मिरेपूड, ओवा, मिरची पेस्ट, मीठ आणि पालक प्युरी घालावी. मिक्स करावे. लागल्यास थोडे पाणी घालून घट्टसर भिजवावे. झाकण ठेवून १५ मिनिटे तसेच ठेवावे.
२) कढईत तेल गरम करावे. तेल गरम झाले कि आच मंद ठेवावी. भिजवलेल्या पीठाचे २ किंवा ३ गोळे करावे. एक गोळा घेउन लाटावे. जाडही नको आणि पातळसुद्धा नको. कातणाने शंकरपाळे कापावे. तेलात तळून घ्यावे.
३) शंकरपाळे तळताना झाऱ्याने हलवत राहावे म्हणजे ते सर्व बाजूंनी नीट तळले जातील. तसेच एकावेळी खूप जास्त शंकरपाळे तळायला सोडू नये. विभागून तळावे.

टीपा:
१) वरील प्रमाणात ४-५ जणांना एकावेळी खाण्यापुरते तयार होईल. जास्त बनवण्यासाठी दुप्पट किंवा तिप्पट प्रमाण घेउन बनवावे. शंकरपाळे थंड झाल्यावर हवाबंद डब्यात भरावे.
२) लहान मुलांसाठी बनवताना मिरपूड कमी घालावी आणि मिरचीपेस्ट  घालू नये.

Related

Travel 8298376982494447217

Post a Comment Default Comments

  1. Hi,
    vaidehi
    kharach khup chhan RCP aahe ...pan yamdhe maidy aivaji kanik vaparle tar chalel ka?

    Aparna

    ReplyDelete
  2. He shankarpale kiti diwas tiktat??
    Rahini

    ReplyDelete
    Replies
    1. Hello,

      he shankarpale nehmichya shankarpalyasarkhech tikatat. sadharan 7-8 divas.

      Delete

item