मेथीचे आळण - Methiche Alan
Methiche Alan in English वेळ: १५-२० मिनिटे वाढणी: २ साहित्य: १ कप मेथीची खुडलेली पाने, बारीक चिरून २ टेस्पून बेसन फोडणीसाठी: १ टीस्पू...
https://chakali.blogspot.com/2013/01/methiche-alan.html?m=1
वेळ: १५-२० मिनिटे
वाढणी: २
साहित्य:
१ कप मेथीची खुडलेली पाने, बारीक चिरून
२ टेस्पून बेसन
फोडणीसाठी: १ टीस्पून तेल, चिमूटभर मोहोरी, चिमुटभर हिंग, पाव चमचा हळद
वरून घातलेली फोडणी: १ टीस्पून तेल, दोन चिमटी हिंग, २ सुक्या लाल मिरच्या (ऐच्छिक)
२ लसणीच्या पाकळ्या, भरडसर चिरून
३/४ कप दही
१ हिरवी मिरची
चवीपुरते मीठ
कृती:
१) दही आणि बेसन एकत्र करून गुठळ्या राहणार नाहीत या हिशोबाने मिक्स करावे.
२) कढईत तेल गरम करून आधी लसूण घालावी. लसूण लालसर झाली कि मोहोरी, हिंग, हळद, हिरवी मिरची, मेथी आणि १/२ टीस्पून मीठ घालावे. मेथी शिजेस्तोवर झाकण ठेवून शिजू द्यावे.
३) मेथी शिजल्यावर आच मंद करावी. यात बेसन मिसळलेले दही घालावे आणि ढवळत राहावे. ढवळायचे थांबवले तर कधीकधी गुठळ्या होतात किंवा दही फुटते. मिश्रण व्यवस्थित मिक्स झाले कि ढवळणे थांबवावे.
४) चव पाहून लागल्यास मीठ तिखट घालावे. ५ ते ७ मिनिटे मंद आचेवर शिजू द्यावे.
वाढताना वाटल्यास वरून तेल, हिंग, आणि लाल मिरच्या यांची फोडणी करून घालावी. मेथीचे आळण भाताबरोबर छान लागते.
पुढल्या वेळेस मेथीची पाने न चिरता, करून पहा- चव छान लागते. . आणि शेवटी पानात घेतल्यावर लसणाची तिखट फोडणी घेतली की छान लागते. (तिखट फोडणी , जिरे, तिखट लसूण घातलेली )
ReplyDeleteभाकरी बरोबर पण मस्त लागते बरं का..
Hi,
ReplyDeleteVaidehi mast Rcp aahe.... nakki try karayla pahije.. karan pithle tar nehmich khato pan thoda veglepana chhan aahe.
Aparna
khupach chhan vaidehi keep it on :)
ReplyDeletethanks
ReplyDeleteKhup chhan
ReplyDeleteDhanyavad
Delete