लस्सी - Lassi

Sweet Lassi in English वेळ: १० मिनिटे वाढणी: २ जणांसाठी साहित्य: दीड कप घट्ट दही, थंडगार २ टेस्पून सायीचे दही (फक्त साय) ३ टेस्पून द...

Sweet Lassi in English

वेळ: १० मिनिटे
वाढणी: २ जणांसाठी
साहित्य:
दीड कप घट्ट दही, थंडगार
२ टेस्पून सायीचे दही (फक्त साय)
३ टेस्पून दुध (कृती: स्टेप १)
४ ते ५ टेस्पून साखर
२ टीस्पून सुका मेवा (काजू, पिस्त, बदाम)
केशराच्या २-४ काड्या (ऐच्छिक)

कृती:
१) जर दही खूप घट्ट असेल तरच दुध घालावे. अथवा घालू नये.
२) दही आणि साखर एकत्र करून मिक्सरमध्ये घुसळावे. मिक्सरऐवजी रवीने घुसळले तरीही चालेल. २-३ मिनिटे तरी घुसळावे.
३) नीट घुसळले गेले की चव पाहून वाटल्यास थोडी साखर घालावी. परत घुसळावे.
४) दोन ग्लासेस मध्ये लस्सी वाढावी. सायीच्या दह्याचा फक्त वरचा सायीचा भाग घ्यावा. प्रत्येक ग्लासमध्ये एकेक चमचा घालावा. सजावटीसाठी काजूपिस्त्याचे काप आणि केशर घालावे. थंडगार सर्व्ह करावी.

टीपा:
१) आवडत असल्यास थोडी वेलची पूड घालावी.
२) पिस्ता फ्लेवरची लस्सी बनवण्यासाठी अगदी किंचित हिरवा रंग घालावा. भरपूर पिस्ते (भिजवून), १-२ थेंब पिस्ता इसेंस घालून लस्सी बनवावी. याप्रमाणेच रोझ, बटरस्कॉच, स्ट्रॉबेरी, अननस असे फ्लेवर वापरून आणि त्यांचे लहान तुकडे लसित घालून लस्सी बनवू शकतो.
३) सायीचे दही बनवण्यासाठी १/२ कप कोमट दुध घ्या त्यात साधारण ३ चमचे साय घाला. त्यात १ चमचा दही घालून एकाच दिशेत चमच्याने मिनिटभर ढवळावे. झाकण ठेवून किमान ५-६ तास विरजण लागू द्यावे.

Related

Party 3817787602833358025

Post a Comment Default Comments

  1. Lassi khupach chaan disat ahe, me nakki karun pahin. Tumchyakade burrito bowl chi recipe ahe ka? Mala Chipotle madhla veg burrito bowl khup avadto ani ghari karun pahaycha ahe :)

    Preeti

    ReplyDelete
  2. Hello Preeti

    Me nakki try karen burrito bowl ani post karen recipe.

    ReplyDelete
    Replies
    1. Hi Vaidehi,
      Same here! Malahi Chipotle madhla veg burrito bowl khup avadto. Please try and post recipe...!
      - Snigdha

      Delete
  3. रेङीमेङ cream बाजारात मीळते ते वापरले तर चालेल का ?
    कारण milk packet वापरते मी,अन ते गरम करावे लागत नाही.

    ReplyDelete
  4. सायीऐवजी क्रीम लस्सी बनवताना नाही वापरता येणार. त्यासाठी सायीच्या दह्यावरची साय हवी.
    साय न घालतासुद्धा लस्सी बनवता येईल. पण त्यामुळे लस्सीचा रिचनेस जातो.

    ReplyDelete

emo-but-icon

Search Recipes

Like Chakali!

item