दुधीच्या सालींची चटणी - Dudhichya Salinchi Chutney

Bottlegourd peel's chutney वेळ: १५ मिनिटे ४ जणांसाठी साहित्य: १/२ कप दुधीची साले, चिरून २ टीस्पून तेल १ टीस्पून भाजलेले तीळ १ टे...

Bottlegourd peel's chutney

वेळ: १५ मिनिटे
४ जणांसाठी

साहित्य:
१/२ कप दुधीची साले, चिरून
२ टीस्पून तेल
१ टीस्पून भाजलेले तीळ
१ टेस्पून भाजलेले शेंगदाणे, साले काढून
१/२ टीस्पून जिरे
३ हिरव्या मिरच्या, चिरलेल्या
३/४ कप ताजा खोवलेला नारळ
१ ते २ कोकम तुकडे (किंवा १ टीस्पून चिंच)
चवीपुरते मीठ

कृती:
१) लहान कढईत तेल गरम करावे. जिरे घालून फोडणी करावी. जिरे थोडे ब्राउन झाले कि दुधीची साले घालावीत. मिनिटभर परतावे.
२) झाकण ठेवून साले मऊ होईस्तोवर शिजवावे. आच मंद ठेवावी. मध्येमध्ये ढवळावे. तसेच लागल्यास पाण्याचा हबका मारावा.
३) साले शिजली कि आच जास्त ठेवून परतावे. भाजून सोललेले शेंगदाणे, तीळ आणि हिरव्या मिरच्या घालाव्यात. मिश्रण कोरडे होईस्तोवर परतावे.
४) हे मिश्रण मिक्सरमध्ये घालावे. यात नारळ, कोकम, आणि मीठ घालून मिक्सरमध्ये वाटावे. थोडे पाणी घालून चटणी करावी.

टीप:
१) दुधीची भाजी किंवा दुधी हलवा केल्यावर त्याची साले फुकट जातात. ती साले वापरून ही चविष्ट अशी चटणी करता येते.

Related

Marathi 4668615027149795276

Post a Comment Default Comments

  1. Great recipe..will definitely try...

    ReplyDelete
  2. Thanks Ashwini
    -------
    Hi Priya

    hi chatani jevatana tondilavayla ghyaychi.

    ReplyDelete
  3. Plz post kadhipatta chutney

    ReplyDelete
  4. Hi Vaidehi,
    Great recipe. Nee chatani phakt hirvya mirchya ani til ghalun karavi ani dahi ghaalun khavi. It also tastes good.

    ReplyDelete

item