टोमॅटो भरीत - Tomato Bharit

Tomato Bhurta in English वेळ: २५ ते ३० मिनिटे वाढणी: ३ जणांसाठी साहित्य: ४ मोठे टोमॅटो २ मध्यम कांदे ५ ते ६ मोठ्या लसूण पाकळ्या ...

Tomato Bhurta in English

वेळ: २५ ते ३० मिनिटे
वाढणी: ३ जणांसाठी

साहित्य:
४ मोठे टोमॅटो
२ मध्यम कांदे
५ ते ६ मोठ्या लसूण पाकळ्या
१ कढीपत्त्याची डहाळी
१ टेस्पून तेल
मोहोरी, जिरे, हिंग, हळद प्रत्येकी २ चिमटी
२ हिरव्या मिरच्या किंवा लाल मिरच्या
चवीपुरते मीठ

कृती:
१) ओव्हन ५०० F वर ५ मिनिटे प्रीहीट करावे.
२) बेकिंग शीटवर १ टीस्पून तेल चोळून घ्यावे. टोमॅटोचे ४ तुकडे करावे. बेकिंग शीटवर पसरवावे. कांद्याचे मोठे तुकडे करून पाकळ्या सोडवून घ्यावे. लसूण ठेचावी. कांदा आणि लसूणसुद्धा बेकिंग शीटवर पसरवाव्यात.
३) टोमॅटोची साल सुरकुतली आणि कांदा थोडा लालसर झाला कि बेकिंग शीट बाहेर काढावी. यला साधारण ४ ते ५ मिनिटे लागतील. (वेळ थोडा कमीजास्त लागू शकतो.)
४) कांदा टोमॅटो बाहेर गार होवू द्यावे. टोमॅटोची साले काढून टाकावीत आणि भरडसर चिरून घ्यावा. कांदा चिरून घ्यावा.
५) कढईत तेल गरम करून त्यात मोहोरी, जिरे, हिंग, हळद, मिरच्या आणि कढीपत्ता घालून फोडणी करावी. त्यात लसूण आणि कांदा घालावा. ३०-४० सेकंद परतावे.
६) आता चिरलेला टोमॅटो आणि मीठ घालावे. मध्यम आचेवर काही मिनिटे परतावे.
पोळीबरोबर किंवा भाकरीबरोबर सर्व्ह करावे.

टीपा:
१) जर ओव्हन नसल्यास फ्राय पॅनमध्ये टोमॅटोचे मोठे तुकडे ठेवावे. आधी पॅनला थोडे तेल लावून घ्यावे. कांदा लसूण नेहमीप्रमाणेच तेलात परतून घ्यावे.
२) टोमॅटो लालबुंद आणि पूर्ण पिकलेले असावेत.
३) शेवटी चवीला थोडी साखर घातल्यास चव छान लागते.

Nutritional Info: Per Serving
Calories:- 93 | Carbs:- 5 g | Fat:- 5 g | Protein:- 2 g | Sat. Fat:- 1 g | Sugar:- 2 g

Related

Tomato 6982628113497341231

Post a Comment Default Comments

item