पाकातले चिरोटे - Pakatle Chirote

Glazed Chirote in English वेळ: १ तास २० मध्यम चिरोटे   साहित्य: ३/४ कप मैदा १/४ कप रवा १ टेस्पून तूप मोहनासाठी चिमुटभर मीठ अंदाज...

Glazed Chirote in English

वेळ: १ तास
२० मध्यम चिरोटे

 साहित्य:
३/४ कप मैदा
१/४ कप रवा
१ टेस्पून तूप मोहनासाठी
चिमुटभर मीठ
अंदाजे १/४ कप दुध
३ ते ४ टेस्पून तूप, वितळलेले
२ ते ३ टेस्पून कॉर्न फ्लोअर
तूप किंवा तेल चिरोटे तळण्यासाठी
१ कप साखर + ३ ते ४ टेस्पून पाणी, गोळीबंद पाकासाठी

कृती:

१) रवा आणि मैदा एका बोलमध्ये घ्यावे. त्यात १ टेस्पून कडकडीत गरम तूप घालावे. चिमूटभर मीठ घालून चमच्याने मिक्स करावे. अंदाज घेउन दुध घालावे आणि मध्यमसर घट्ट असा गोळा भिजवावा. २० मिनिटे झाकून ठेवावे.
२) २० मिनिटांनी भिजवलेल्या गोळ्याचे ६ सारखे भाग करावे. त्यातील ३ भाग घेउन बाकीचे ३ भाग नंतरसाठी झाकून ठेवावे. प्रत्येक गोळ्याची पातळसर पोळी लाटावी. लाटताना शक्यतो नुसतीच लाटावी, पीठ घेउ नये.
३) २ ते ३ टेस्पून तूप वितळवावे. त्यात २ ते ३ टीस्पून कॉर्न फ्लोअर घालून पेस्ट बनवावी. हि पेस्ट पातळसर असावी जेणेकरून ती पोळीवर व्यवस्थित पसरेल.
४) पोळपाटावर १ लाटलेली पोळी घ्यावी. त्यावर बनवलेली पेस्ट पसरावी. त्यावर दुसरी लाटलेली पोळी बरोबर पहिल्या पोळीवर येईल अशी ठेवावी. या पोळीवर तुप-कॉर्न फ्लोअरची पेस्ट लावावी. वर तिसरी पोळी ठेवून उरलेली पेस्ट यावर लावावी.
५) दोन विरुद्ध बाजूंनी गुंडाळी करत मध्यभागी आणाव्यात. मग एक गुंडाळी दुसरीवर ठेवून घट्ट रोल बनवावा. वरून थोडा दाब द्यावा. अशाप्रकारे उरलेल्या तीन पोळ्या बनवून रोल बनवावा. थोडावेळ न झाकता तसेच ठेवावे म्हणजे तूप थोडे गोठेल आणि रोल हाताळण्यायोग्य होईल.
६) मधल्या वेळेत साखर आणि पाणी एकत्र करून गोळीबंद पाक करावा. आच बंद करावी.
७) जेव्हा दोन्ही रोल थोडे सुकतील, तेव्हा कढईत तूप गरम करावे. रोलचे १ इंचाचे तुकडे करावे. एक तुकडा घेउन लेयर असलेली बाजू वर अशाप्रकारे ठेवून हाताने दाब देउन चपटे करावे. लाटणे फिरवून साधारण अडीच इंचाची पुरी बनवावी. अशाप्रकारे सर्व चिरोटे बनवावे. तयार झालेले चिरोटे तुपात मंद आचेवर तळावे.
८) चिरोटे बदामी रंगावर तळून घ्यावे. तळलेले चिरोटे स्टीलच्या चाळणीत उभे करावे म्हणजे अधिकचे तूप गळून चाळणीत जमेल. जेव्हा चिरोटा थोडा कोमट होईल तेव्हा चिरोटा साधारण गरम असलेल्या पाकात घालावा. मिनिटभर ठेवून बाहेर काढावा. आणि उभा करून ठेवावा. चिरोटे एकावर न ठेवता थोडे सेपरेट ठेवावेत.
चिरोटे गार झाले कि वर पाकाचे छान ग्लेझिंग येते.

टीपा:

१) तुपाऐवजी तेल किंवा डालडा वापरले तरी चालेल. पण तुपामुळे चव जास्त खमंग लागते.
२) साखरेचा पाक गोळीबंद करावा. एकतारी किंवा दोनतारी केल्यास चीरोट्यात पाक शोषला जावून चिरोटे नरम पडतील.
३) मोहनासाठी वापरलेले तूप कडकडीत गरम असावे. नाहीतर चिरोटे नरम पडतील.
४) कॉर्न फ्लोअरऐवजी तांदुळाचे पीठही वापरू शकतो.
५) मळलेल्या पीठ २० मिनिटे झाकून ठेवल्यावर घट्ट होवू शकते कारण रवा ओलेपणा शोषून फुगतो. अशावेळी चमचा-दोन चमचे दुध घालून पीठ परत मळावे.
६) साखरेच्या पाकात चिरोटे घालायचे नसल्यास, चिरोटे तळल्यावर बाहेर काढावे. १-२ मिनिटांनी चिरोट्यावर पिठीसाखर भुरभुरावी.
७) पाचव्या स्टेपमध्ये दोन विरुद्ध बाजू गुंडाळण्याऐवजी एकच बाजू शेवटपर्यंत गुंडाळली तरी चालते.
८) जर चौकोनी/आयताकृती आकारात चिरोटे हवे असल्यास रोलचा १ इंचाचा तुकडा घ्यावा. आणि प्लेन बाजू वर ठेवून उभे आणि आडवे लाटणे फिरवावे. (फक्त या आकारात चिरोटे बनवायचे झाल्यास स्टेप ५ मध्ये दिल्याप्रमाणेच रोल बनवावा.)

Related

Sweet 8496982489566597907

Post a Comment Default Comments

  1. chirote pakat takaycha aivaji pithi sakhar bhubhrli tar chan crispy hotil ka?
    mala crispy chirote avadtat

    ReplyDelete
  2. माझी फेवरेट डीश.माझ्या प्रत्येक वाढदिवसाला घरी केली जाणारी :)
    आणि हो, पाकात थोडं लिंबू पिळायची आई.. :) छान चव येते, ट्राय करून पहा.
    ( सुधारस पण माझा अजूनही आवडता पदार्थ आहे, त्या मुळे ती थोडी किंचित आंबटसर चव मला आवडते )

    ReplyDelete
  3. Hi vaidehi,

    wow...... khupach chhan.
    i m fan of ur blog. its amazing.
    keep it up. me singapore madhe ahe pan tarihi maharashtrian dishes banvane khupach sope zale ahe......only bcoz of u. really thanks.
    god bless u.

    Monika

    ReplyDelete
  4. Replies
    1. hey vaidehi dii kharach tujhamule mala jevan banavnyachi aawad nirman jhali.... tujhya sarvch recipes khup chan ahet... keep it up!!!

      Delete
  5. नमस्कार महेंद्र,
    पाकात लिंबाचा रस नक्की ट्राय करून पाहीन.

    ReplyDelete
  6. Hello

    Chirote Talun zalyavar ek minute nantar tyavar pithi sakhar peravee. Chhan chav yete.

    ReplyDelete
  7. hi vaibhavi, m jst blog open kela tula sangayla ki chirote recipe post kar mhanun, nd baghte tr recipe posy keleli :)
    thanks a lot...
    Try kele ki lagech kalavte tula .
    Shweta

    ReplyDelete
  8. tuzya chirotyala chhan padar sutlet ! Tu konatya method ni latles chirote? Nd goliband pakat dip karun baher thevle tr mau nahi na pdnar ?

    ReplyDelete
  9. Thank you commentsathi

    Goliband pakat dip kelyavar mau nahi padat. mhanunach ghatta pak karava. paak patal asel tar chirota bhijto.

    He chirote far divas nahi tikat, hardly 4-5 divas (pan itke chavishtha asatat ki 4-5 divas uratach nahit;) )

    ReplyDelete
  10. hi vaidehi, m ajch try kele mast tastey zalele bt padar navhate sutle. Plz guide. Puri sarkhe zalele nd madhe chakali sarkh circles disat hote :D shweta

    ReplyDelete
  11. hi vaidehi, m ajch try kele mast tastey zalele bt padar navhate sutle. Plz guide. Puri sarkhe zalele nd madhe chakali sarkh circles disat hote :D shweta

    ReplyDelete
  12. Chirotyala aatmadhye sata baryapaiki lavava lagto. Tasech latatana khup jast jor deun latu naye. chirota toopat taklyavar jharyane surfacevar toop udavave. mhanje padar sutatat.

    ReplyDelete
  13. ok . M nxt time guideline follow karel shweta

    ReplyDelete
  14. mi aaj try keli recipe pan chirote chakali sarkhe zale telamadhe baheracha padar tutayacha ani sagala sata telat utaraycha(mi satyasathi tandalache pith vaparale hote)Pithisakhar takun khanyasathi hatat ghetale ki sagla chirota tutun jayacha, pakat taklyanantar jara firm zale Pls reply kay chukale kahi tips dya

    ReplyDelete
  15. satyat Tandulache pith vaparle tarihi chalte. tasech chirota kaplelya bajuvar latla ki sata baher yeto.
    mala kadhi asa prasang ala nahi tyamule nakki kay chukale asave te sangta yet nahi. Kadachit mohan jast zalyane kinva chirotyala tel nit tapale nasalyane ase ghadle asel.

    ReplyDelete
  16. hello vaidehi, will u plz post d video of chirote! Shweta

    ReplyDelete
  17. hello vaidehi, will u plz post d video of chirote! Shweta

    ReplyDelete
  18. Hello Shweta

    Next time when I make chirote I will surely post the video or step by step images.

    ReplyDelete
  19. hello sugran, thanx , :) shweta

    ReplyDelete
  20. hi kiti diwas tikatat hey

    ReplyDelete
  21. far diwas tikat nahit. 8-9 divasach tiktil. (tevdhe divas urat suddha nahit :))

    ReplyDelete
  22. chirote khup mast lagatat mala khup aavadatat... Mazi mom diwalit karte chirote...

    ReplyDelete
  23. Hi Vaidehi,

    Recipe khup chan ahe pn goliband pak kasa karayacha?

    ReplyDelete
  24. Hi, vaidehi, mazhi sarwat aawadata menu...... mi tumhi suchawilya pramane aata nakki karun pahin .thnxs..

    ReplyDelete
  25. Hi vaidehi,
    Mi try kele chirote ani khupach chaan jhale..
    Ur blog is fab..
    Keep on posting nd vl get to learn..
    Regards nd best wishes..
    Janhavi Surpur

    ReplyDelete
  26. Hi Vaidehi, thanks. Mi suddha Karun pahile. Pan naram jhale. padar barobar sutale. aani pitisakhar bhurbhurali karan goliband pak kasa karayacha te mahit nahi. tumhi sangal ka? naram asale tari ghari balushahi samajun sarvani khalle. Reshma,Mumbai

    ReplyDelete

item