पेरूची कोशिंबीर - Peruchi Koshimbir

Peru (Guava) Raita in English वेळ: १० मिनिटे वाढणी: २ ते ३ जणांसाठी साहित्य: २ मध्यम आकाराचे पिकलेले पेरू १/२ कप सायीचे दही २ ...

Peru (Guava) Raita in English

वेळ: १० मिनिटे
वाढणी: २ ते ३ जणांसाठी
साहित्य:
२ मध्यम आकाराचे पिकलेले पेरू
१/२ कप सायीचे दही
२ हिरव्या मिरच्यांची पेस्ट
२ टेस्पून कोथिंबीर, बारीक चिरून
१/८ टीस्पून मोहोरी पावडर
२ टीस्पून साखर (किंवा चवीनुसार)
चवीपुरते मीठ

कृती:
१) पेरू धुवून घ्यावेत. देठाकडील भाग थोडा कापून टाकावा. पेरू वरवर किसावा. गाभ्याकडील बियांचा भाग घेउ नये.
२) दही फेटून घ्यावे. त्यात किसलेला पेरू घालावा. मिरची पेस्ट, कोथिंबीर आणि मोहोरी पावडर घालावी. त्यात साखर आणि मीठही घालावे.
३) सर्व मिक्स करून चव पहावी. जर कोशिंबीर खूप दाट वाटत असेल तर २ टेस्पून दही किंवा २-३ टेस्पून दुध घालावे. वाटल्यास थोडी साखर आणि मिरची घालावी.
बदल म्हणून पेरूची कोशिंबीर छान लागते.

टिपा:
१) पेरू खूप जास्त पिकालेलेही नकोत आणि कच्चेही नकोत.
२) या कोशिंबीरीला पेरूच्या बारीक फोडी केल्या तरी चालतात. पण पेरू किसल्याने कोशिंबीर मिळून येते.
३) दही गोड असावे.

Related

Raita 3645935753250892339

Post a Comment Default Comments

  1. वैदेही
    ’पास्ता’ ची रेसिपी प्लीज टाक ना! वुईथ पेस्टो सॉस आणि एकदोन व्हेरिएशन्स सहित! आणि भारतात पदार्थांच्या उपलब्धतेसह!
    थॅंक्यू... :-)

    अश्विनी

    ReplyDelete
  2. sai che dahi kase lavave?
    Sarika

    ReplyDelete
  3. Hi Sarika

    Tyachi pan recipe lavkarach post karen.

    ReplyDelete
  4. Likes so much... Wife really impressed....Thanks

    ReplyDelete

item