चिकू मिल्कशेक - Chikoo Shake

Chikoo Milkshake in English वेळ: १० मिनिटे २ सर्व्हिंग्ज साहित्य: दीड कप चिकूच्या मध्यम फोडी (५ ते ६ मध्यम चिकू) १ कप दुध (शक्यतो थ...


वेळ: १० मिनिटे
२ सर्व्हिंग्ज
साहित्य:
दीड कप चिकूच्या मध्यम फोडी (५ ते ६ मध्यम चिकू)
१ कप दुध (शक्यतो थंड)
२ ते ३ टीस्पून साखर

कृती:
१) चिकूच्या देठाकडील भाग कापावा. चिकू सोलून त्याचे दोन भाग करावे. बिया काढाव्यात. आणि मधोमध असलेला पांढरट भाग कोरून काढावा. (हा पांढरट भाग थोडा चिकट असतो. आणि शेक पिताना कधीकधी तोंडाला चिकटा बसतो). आता चिकूच्या फोडी कराव्यात.
२) चिकूच्या फोडी आणि थोडे दुध मिक्सरमध्ये घालावे. साखरही घालावी आणि मिक्सरमध्ये वाटावे. चिकूची प्युरी झाली कि उरलेले दूधही घालावे, आणि मिक्सरवर बारीक करावे. (मिल्कशेक कितपत घट्ट हवा असेल त्यानुसार दुधाचे प्रमाण कमीजास्त करावे.)
३) मिल्कशेक फ्रीजमध्ये ठेवून ३-४ तासांनी सर्व्ह करावा.

टीप:
१) थंडगार दुध घालून शेक बनवला तर लगेच सर्व्ह करता येईल.

Related

Milkshake 991319001481538395

Post a Comment Default Comments

item