आंबा मोदक - Amba Modak

Mango Modak in English वेळ:३० मिनिटे २५ ते ३० लहान मोदक साहित्य: १/२ कप हापूस आंब्याचा मावा ( रेसिपीसाठी इथे क्लिक करा ) ३/४ कप साखर...

Mango Modak in English

वेळ:३० मिनिटे
२५ ते ३० लहान मोदक
साहित्य:
१/२ कप हापूस आंब्याचा मावा (रेसिपीसाठी इथे क्लिक करा)
३/४ कप साखर
१/२ कप खवा
१ टीस्पून तूप

कृती:
१) साखर मिक्सरमध्ये बारीक करून पिठी साखर बनवावी. पिठीसाखर बारीक चाळणीतून चाळून घ्यावी. चाळणीत राहिलेली जाडसर साखर खलबत्त्यात कुटून बारीक करावी.
२) माय्क्रोवेव्हसेफ भांडे घ्यावे. त्यात तूप आणि आंब्याचा मावा घालावा. दीड मिनिट मायाक्रोबेव्ह करावे. भांडे बाहेर काढून ढवळावे. जरा निवळले कि परत १ मिनिट आणि नंतर ३० सेकंद असे मायक्रोवेव्ह करावे. मावा जळणार नाही याची काळजी घ्यावी.
३) भांडे बाहेर काढून ३० सेकंद ढवळा. आता खवा हाताने मोडून या माव्यात मिक्स करावा. ३०-३० सेकंद मायक्रोवेव्ह करावे. (प्रत्येक ३० सेकंदानी भांडे बाहेर काढून मिश्रण ढवळावे.)
४) मिश्रण पातळसर वाटत असेल तर अजून २० ते ३० सेकंद मायक्रोवेव्ह करावे. [मिश्रण बाहेर काढाल तेव्हा ते बुडबुडेयुक्त आणि थोडेसेच पातळ असेल. थोडावेळ चमच्याने ढवळले कि निवळून घट्टसर बनते.
५) मिश्रण घट्ट आणि चिकट बनेल. अगदी कोमट झाले कि साखर घालून मिक्स करा. साखर मात्र एकावेळी थोडीथोडीच घालावी. मिश्रण मायक्रोवेव्ह बाहेर काढल्या काढल्या साखर घालू नये. साखर वितळून मिश्रण एकदम पातळ होते.
६) मिश्रण घट्टसर झाले कि मोदकाच्या साच्यात मिश्रण भरून मोदक बनवावे.

टिप्स:
१) मिश्रण आळायला थोडा वेळ कमी किंवा जास्त लागू शकतो. आंब्याचा रस कितपत आटवला आहे त्यावरून वेळ कमीजास्त लागू शकतो.
२) जर मिश्रण चिकटसरच राहिले तर घट्टपणासाठी थोडी मिल्क पावडर घालू शकतो.
३) साखर घातल्यावर मिश्रण मायक्रोवेव्हमध्ये गरम करू नये.
४) साखर मिक्सरमध्ये बारीक केल्यावर बारीक चाळणीमधून चाळून घ्यावी. चाळणीत राहिलेली साखर परत बारीक करावी. जर पिठी साखर न चाळता घेतली तर साखरेचे बारीक बारीक कण मोदक खाताना दाताखाली येतात.
५) हे मोदक मायक्रोवेव्हमध्ये करायला सोप्पे आहेत. पण गॅसवर सुद्धा हे मोदक करता येतील. पॅनमध्ये खवा मोकळा करून मध्यम आचेवर भाजावा. त्यातील तूप बाहेर येईपर्यंत भाजला गेला पाहिजे. भाजलेला खवा दुसऱ्या भांड्यात काढून ठेवावा. कोमटसर झाला कि चाळलेली पिठीसाखर यात घालावी आणि मळावे. मिश्रण चिकट झाले तर दोन-तीन चमचे मिल्क पावडर घालावी. मोदकाच्या साच्यात घालून मोदक करावेत.
६) अमेरिकेत खवा बहुतांश इंडियन ग्रोसरी स्टोअर्समध्ये मिळू शकतो. (फ्रोझन सेक्शनमध्ये शोधा)
७) जर फ्रोझन खवा वापरणार असाल तर लागेल तेवढा खवा २ तास फ्रीज बाहेर काढून ठेवा आणि रूम टेम्परेचरला येउ द्या.
८) जर आंब्याचा मावा उपलब्ध नसेल तर कॅनमधील आंब्याचा रस वापरू शकतो. फक्त हा रस मायक्रोवेव्हमध्ये जास्तवेळ आटवावा लागेल. तसेच या रसात साखर असते, आटवल्यावर रसाचा रंग थोडासा बदलू शकतो.

Related

Sweet 3226305623993104016

Post a Comment Default Comments

 1. what is mango mawa?

  ReplyDelete
 2. Mango mawa is thickened mango pulp. I will post recipe soon.

  ReplyDelete
 3. ravyachya modakchi receipe paste karna masta soft hotat pan majhe kadak jhalele


  Aditi

  ReplyDelete

emo-but-icon

Search Recipes

Like Chakali!

item