शेवगांच्या शेंगांची भाजी - Drumsticks Sabzi

Drumstick Sabzi in English वेळ: ३० ते ३५ मिनिटे वाढणी: ४ ते ५ जणांसाठी साहित्य: ३ शेवग्याच्या शेंगा, ३ ते ४ इंचाचे तुकडे करावे १ ...

Drumstick Sabzi in English

वेळ: ३० ते ३५ मिनिटे
वाढणी: ४ ते ५ जणांसाठी

साहित्य:
३ शेवग्याच्या शेंगा, ३ ते ४ इंचाचे तुकडे करावे
१ कप बेसन
१/२ कप ताजा खोवलेला नारळ
३ सुक्या लाल मिरच्या
३ कोकमचे तुकडे
फोडणीसाठी: २ टेस्पून तेल, २ चिमटी मोहोरी, २ चिमटी जिरे, १/४ टीस्पून हिंग, १/४ टीस्पून हळद,
अडीच ते ३ कप पाणी
चवीपुरते मीठ

कृती:
१) कढईत तेल गरम करून त्यात मोहोरी, हिंग, हळद, आणि लाल मिरच्या अशी फोडणी करावी. त्यात चिरलेल्या शेवग्याचा शेंगा घालाव्यात. नारळ आणि कोकमही घालावे. आच मध्यम करून झाकण ठेवून शेंगा शिजू द्याव्यात. वरील झाकणात थोडे पाणी ठेवावे. म्हणजे वाफेचे पाणी कढईत ठीबकून शेंगा शिजायला मदत होईल.




२) ३-४ मिनिटांनी झाकणात पाणी उरले असेल तर ते कढईत घालावे. तसेच अजून अडीच कप पाणी आणि मीठ घालून मिक्स करावे. ८ ते १० मिनिटे उकळी काढावी. शेंगा आतपर्यंत शिजल्या पाहिजेत. पण जास्तही शिजवू नये, त्या अख्ख्या राहिल्या पाहिजेत.




 
 ३) एकदा शेंगा शिजल्या कि आच कमी करून बेसन घालावे. आणि लगोलग ढवळावे म्हणजे गुठळ्या होणार नाहीत. सर्व बेसन मिक्स झाले कि नुसते झाकण ठेवून बेसन शिजेस्तोवर वाफ काढावी. या कालावधीत अधून-मधून तळापासून ढवळावे.


कोथिंबीरीने सजवावे. पोळी किंवा भाकरीबरोबर गरमच सर्व्ह करावी.


टीपा: 
१) कढईवर पाण्याचे ताट ठेवल्याने कढईत वाफेमुळे थोडेथोडे पाणी पडत राहते ज्यामुळे भाजीला ओलसरपणा राहतो, भाजी करपत नाही आणि शिजायलाही मदत होते.
२) मी बेसन घातले तेव्हाच १ टीस्पून साखरही घातली. परंतु, साखर ऐच्छिक आहे.

Related

Marathi 4584449776989377346

Post a Comment Default Comments

  1. Vaidehi
    khup mast RCP aahe mi fakt kanda & tel yamdhe shenga karte pan aata jara navin RECP Karayla milel

    Thanks

    ReplyDelete
  2. हा पदार्थ मला आवडला फेसबुक वर लिक दिली आहे

    ReplyDelete
  3. धन्यवाद सुमा

    ReplyDelete
  4. पहिल्या स्टेप मध्ये पाणी न घालता शेंगा कश्या शिजतील ।जरी झाकणात पाणी ठेवले तरी?

    ReplyDelete
    Replies
    1. var zakanat pani aste tyachi vaaf houn bhandyat padte ani tya vafevar shenga shijtat.

      Delete

item