मिश्र कडधान्याची धिरडी - Mixed Kadadhanya Dhirade
Mixed Kadadhanya Dhirade in English वेळ: ४ मिनिटे प्रत्येकी एका धिरड्याला १५ मध्यम आकाराची धिरडी साहित्य: १ कप वरपर्यंत भरून मिश्र...
https://chakali.blogspot.com/2012/07/mixed-kadadhanya-dhirade.html?m=1
वेळ: ४ मिनिटे प्रत्येकी एका धिरड्याला
१५ मध्यम आकाराची धिरडी
साहित्य:
१ कप वरपर्यंत भरून मिश्र कडधान्य (मी मुग, मटकी, कबुली चणे, मसूर, उडीद, चवळी आणि हिरवे वाटाणे वापरले होते.)
३ ते ४ हिरव्या मिरच्या किंवा चवीनुसार
१ टीस्पून जिरे
१/४ कप तेल
१/४ कप कोथिंबीर, बारीक चिरून
चवीपुरते मीठ
इतर ऐच्छिक साहित्यासाठी टीप २ पहा.
कृती:
१) सर्व कडधान्ये एकत्र करून पाण्यात ८ ते १० तास भिजवावीत. पाण्याची पातळी साधारण ३ ते ४ इंच वर असावी.
२) कडधान्ये नीट भिजली कि त्यातील न भिजलेली, कडक राहिलेली कडधान्ये वेचून काढून टाकावीत.
३) स्वच्छ केलेली कडधान्ये कापडात बांधून मोड यायला उबदार जागी ठेवावी. ७ ते १० तासांनी मोड येतील.
४) मोड आले कि मिक्सरमध्ये कडधान्ये, मिरच्या, मीठ आणि गरजेनुसार पाणी घालून किंचित भरडसर राहील असे फिरवावे. इडली पीठाएवढे घट्ट असावे.
५) चिरलेली कोथिंबीर, जिरे आणि मीठ (लागल्यास) घालावे.
६) नॉन-स्टीक तवा गरम करून त्यावर थोडेसे तेल घालावे. डावभर पीठ घालून ते जमेल तेवढे पातळ पसरवावे. आच मध्यम ठेवावी. झाकण ठेवून २-३ मिनिटे वाफ काढावी. नंतर झाकण काढून धीरड्याच्या कडेने तेल सोडावे. बाजू पालटून दुसरी बाजूही नीट शिजू द्यावी.
७) टोमॅटो केचप किंवा आवडीचे तोंडीलावणे घेउन गरमच खावे.
टिप्स:
१) मी १/४ कप मुग, १/४ कप मटकी, १/४ कप काबुली चणे, २ ते ३ टेस्पून उडीद (किंवा उडीद डाळ), १/४ कप मसूर, ३ टेस्पून चवळी, ३ टेस्पून हिरवे वाटाणे घेतले होते. तुम्हाला आवडीनुसार आणि घरात अव्हेलेबल असलेले कोणतेही कडधान्य वापरू शकता. फक्त वाल किंवा तत्सम उग्र वास असणारे कडधान्य वापरू नये.
२) यामध्ये ठेचलेली लसूण आणि चिरलेला कांदाही घालू शकतो. तसेच कोथिंबीरीऐवजी पालकाची पाने बारीक चिरून घालू शकतो.
Vaidehi,
ReplyDeleteDhiradichi receipe mala havi hoti. Post kelyabaddal thanks. lagech karun pahate.
mala gharguti aamchur powder kashi banvavi te kalel ka? please.
thank you for the comment
ReplyDeleteAmchur powder chi recipe nakki post karen
Hello Vaidehi, Thanks for the recipe. Healthy, simple and yummy. One anonymous requested for making aamchur powder recipe. You get dry mango pieces in market, bring them and grind and u get aamchur powder, else during summer when raw mangoes are available in the market, get some raw mangoes, peel them, make small pieces or grate them and dry them under the sun for 4-5 days. Then make a powder in a mixer. Keep in air tight bottle. Stays good for a year.
ReplyDeletehello vaidehi,
ReplyDeletekadadhanyache vade banavata yetil ka??
Kadadhanyachya bhaji banavlya tar jast chhan lagtil. kadadhanye mixermadhye vatatana tyat lasun ani thode ale ghalave mhanaje chav chhan lagel.
ReplyDeleteThank you Rohini
ReplyDeletekadadhanyache bhaji means nemk kas
ReplyDeleteshweta
Namaskar Shweta
ReplyDeletetumcha prashna mala nit kalala nahi. tumhi jar detail madhye sangal ka?
hi vaidehi , tula m prashn v4lela ki kaddhanyanche vade karta yetil ka tr tu mala bhaji chhan hotil as suggest kelas. Tar bhaji kase banvavet? Shweta
ReplyDeletehello vaidehi, tumhi sangal ka ki dhapate kase banvayche?
ReplyDeleteHi श्वेता
ReplyDeleteकडधान्ये भिजवून मोड काढावीत. मिक्सरमध्ये पाणी न घालता किंवा लागल्यास अगदी थोडेसेच पाणी घालून वाटावे. वाटताना लसूण, आलं मिरची, जिरे, घालून भरडसर वाटावे. त्यात वाटल्यास कोथिंबीर, हळद घालावे. आणि त्याची छोटी छोटी भजी तळावीत.
va mastch ,vaidehi.mi nakki try karun kalvel kase zale bhaji te... :) shweta
ReplyDeletethank you shweta
ReplyDeletedhapate recipe nakki post karen.
ReplyDeletehi vaidehi , mod na kadhata dhiradi banavali tar chalel ka?
ReplyDeleteहो चालेल.
ReplyDelete