कांदा बटाटा रस्सा - Kanda Batata Rassa

Kanda batata Rassa in English वेळ: २५ मिनिटे वाढणी: ४ जणांसाठी साहित्य: १ मोठा कांदा ४ माध्यम बटाटे फोडणीसाठी: १ तेस्पून तेल, १/...

Kanda batata Rassa in English


वेळ: २५ मिनिटे
वाढणी: ४ जणांसाठी


साहित्य:
१ मोठा कांदा
४ माध्यम बटाटे
फोडणीसाठी: १ तेस्पून तेल, १/४ टीस्पून मोहोरी, १/४ टीस्पून हिंग, १/४ टीस्पून हळद, १/२ टीस्पून लाल तिखट, ४ ते ५ कढीपत्ता पाने
२ ते ३ टेस्पून शेंगदाण्याचा कूट (किंचित भरडसर)
१ टेस्पून ताजा नारळ, खोवलेला
२ टीस्पून चिंचेचा घट्ट कोळ
२ ते ३ टेस्पून गूळ किंवा चवीनुसार
२ टीस्पून गोडा मसाला
चवीपुरते मीठ

कृती:
१) पांढरा किंवा पिवळा कांदा वापरा. दोन्ही टोके कापून कांदा सोलून घ्यावा. मध्यम आकाराच्या फोडी कराव्यात. कांदा खूप मोठा असल्यास कांद्याचे पदर विलग करावे.
२) बटाटे सोलून लहान तुकडे करावेत.
३) कढईत तेल गरम करावे. मोहोरी, हिंग, हळद, तिखट आणि कढीपत्ता घालून फोडणी करावी. ५ ते ७ सेकंद परतून त्यात बटाट्याच्या फोडी घालाव्यात. मिक्स करून वर झाकण ठेवावे आणि मध्यम आचेवर वाफेवर बटाटा शिजू द्यावा. बटाटा साधारण ७० % शिजू द्यावा.
४) बटाटे अर्धवट शिजले कि त्यात कांदा आणि मीठ घालावे. झाकण ठेवून ३-४ मिनिटे वाफ काढावी.
५) रस्सा तयार होईल इतपत पुरेसे पाणी घालावे. चिंच कोळ, गोडा मसाला, दाण्याचा कुट आणि नारळ घालावे. मध्यम आचेवर उकळी काढावी.
६) कांदा, बटाटा शिजला कि गुळ घालावा. गुळ घालून २-३ मिनिटे उकळी काढावी. कोथिंबीर घालून मिक्स करावे. गरम भात किंवा पोळीबरोबर कांदा बटाट्याचा रस्सा वाढावा.

Related

Rassa Bhaji 7208020117846928962

Post a Comment Default Comments

  1. Vaidehi,

    chhan RCP aahe Mazi AAji karayachi ashi bhaji pan tichya hatachi chav nahi yet

    ReplyDelete
  2. batate 70takke shijale he kasa samajawa?

    ReplyDelete
  3. Namaskar Vishal,

    batatyache tukade 2 vela vaf kadhalyavar purna shijat nahi pan agadi kacchehi rahat nahit. chamchyane batata tochun pahava. batata ekdum tutalahi nahi pahije pan ardhavat shijalela asala ki to sadharan 70 takke shijala ase samjave.

    ReplyDelete
  4. Hi Aparna,

    nakki karun paha ani kalav kashi zali bhaji te.

    ReplyDelete
  5. Hi Vaidehi,

    mi aajach hi recipe keli ani khupach chhan zali. Simple , quick & tasty. Thanks..... Neeta

    ReplyDelete
  6. Batata chirlyavar kahi lok to panyat thevtat ani mag taktat..Ya bhaji sathi tase kel tar chalel ka?

    ReplyDelete
  7. Batata chirlyavar kahi lok to panyat thevtat ani mag taktat..Ya bhaji sathi tase kel tar chalel ka?

    ReplyDelete
  8. batata chiralyavar haveshi sampark yeun kala padto mhanun to panyat taktat. jar lagech chirun fodnis taknar asal tar panyat takaychi garaj nahi.

    Bhajichi tayari karun thevaychi asel tar batata panyat takun theva.

    ReplyDelete
  9. Khup chhan recipe aahe...

    ReplyDelete
  10. Ha rassa ani tandulachi bhakari mhanje bliss! Chinch-gul ghalun kelelya padarthanchi mi fan ahe...Kontya bhajit Gul ghalaycha n kontya bhajit sakhar he kasa tharavtat?

    ReplyDelete
  11. शक्यतो चिंच ज्या भाजीत घालतो त्यात नक्की गुळच वापरावा. तसेच चवीला उग्र भाज्या जसे कोबी, फ्लॉवर यामध्ये गुळ वापरल्यास त्यांचा उग्रपणा कमी होतो. तरीही कोबीच्या भाजीत साखरही चांगली लागते.
    पंजाबी भाज्यात वापरल्यास साखर वापरावी.
    मी बराचशा भाज्यांत गुळच वापरते. फक्त कोबी, किंवा टॉमेटोचा मिक्स भाज्यांचा रस्सा अशा भाज्यांत साखर वापरते.

    ReplyDelete
  12. Hi Vaidehi,

    Mala tujha blog khup avadto. Saglyach recipes khup chhan ahet. Thank you. :)

    ReplyDelete
  13. Made it first time.... Aroma & test .... Yummyyyyy ;) thanksssss

    ReplyDelete
  14. I can try it...first time..test natar sagto..vaidehi

    ReplyDelete
  15. Chich jast zali tr Kay kraych

    ReplyDelete
    Replies
    1. chinch jast zali tar far kahi karta yet nahi.. Gul, thoda tikhat ani thoda mith vadhavayche

      Delete

item