त्झात्झीकी सॉस - Tzatziki sauce
Tzatziki Sauce in English वेळ: ५ ते ७ मिनिटे १ कप सॉस (४ जणांसाठी) साहित्य: १ मोठी काकडी, सोलून, बिया काढून टाकाव्यात आणि मध्यम त...
https://chakali.blogspot.com/2012/04/tzatziki-sauce-falafel.html?m=1
Tzatziki Sauce in English
वेळ: ५ ते ७ मिनिटे
१ कप सॉस (४ जणांसाठी)
साहित्य:
१ मोठी काकडी, सोलून, बिया काढून टाकाव्यात आणि मध्यम तुकडे करावेत
दीड कप दही (शक्यतो फुल फॅट) (टीप)
२ लसणीच्या पाकळ्या, बारीक चिरून
१ टेस्पून फ्रेश डील (किंवा १ टीस्पून ड्राईड डील) (टीप)
१ टेस्पून ऑलिव्ह ऑईल
१ टेस्पून लिंबाचा रस
चवीपुरते मीठ
कृती:
१) दही १ तासभर टांगून ठेवावे. जेणेकरून दही थोडेसे घट्ट होईल.
२) टांगलेले दही, लसूण, डील, ऑलिव्ह ऑईल, लिंबाचा रस, आणि मीठ ब्लेंडरमध्ये घालून ब्लेंड करावे. नंतर काकडीचे तुकडे घालून भरडसर ब्लेंड करावे.
तयार त्झात्झीकी सॉस फलाफल बरोबर सर्व्ह करावा.
टिप्स:
१) पारंपारिक पद्धतीनुसार त्झात्झीकी सॉस ग्रीक योगर्ट (मध्यमसर घट्ट चक्का) पासून बनवतात. जर ग्रीक योगर्ट असेल तर ते तसेच डायरेक्ट वापरावे. नसल्यास दही थोडावेळ टांगून मग वापरावे.
२) डीलऐवजी पुदिन्याची पानेही वापरू शकतो.
३) लिंबाचा रस नसल्यास थोडेसे व्हिनेगर वापरले तरीही चालेल.

Post a Comment