फलाफल - Falafel
Falafel in English वेळ: ३५ ते ४० मिनिटे ८ ते १० मध्यम फलाफल साहित्य: दीड कप भिजलेले काबुली चणे (छोले) २ टीस्पून बेसन (टीप १) ३ म...
https://chakali.blogspot.com/2012/04/falafel-recipe.html?m=1
वेळ: ३५ ते ४० मिनिटे
८ ते १० मध्यम फलाफल
साहित्य:
दीड कप भिजलेले काबुली चणे (छोले)
२ टीस्पून बेसन (टीप १)
३ मोठ्या लसूण पाकळ्या
१ टीस्पून धनेपूड
१/२ टीस्पून जिरेपूड
१/२ कप पार्सली
२ हिरव्या मिरच्या किंवा १/२ टीस्पून लाल तिखट
१ लिंबाचा रस
चवीपुरते मीठ
तळण्यासाठी तेल
लहान चिमटी खायचा सोडा
कृती:
१) भिजलेले काबुली चणे मिक्सरमध्ये घालावेत, पाणी घालू नये. त्यात लसूण, पार्सली, हिरवी मिरची, मीठ आणि लिंबाचा रस घालावा. भरडसर वाटून घ्यावे. वाटलेले मिश्रण एका वाडग्यात काढावे. त्यात बेसन, खायचा सोडा आणि धने-जिरेपूड घालावी आणि मिक्स करावे. चव पाहून गरज वाटल्यास तिखट मीठ घालावे.
२) कढईत तेल गरम करावे. तेल गरम झाले कि आच मध्यम करावी.
३) साधारण दीड टेस्पून मिश्रण घेउन त्याचा घट्ट गोळा बांधावा. हा गोळा गरम तेलात घालावा. गोल्डन ब्राउन होईस्तोवर तळावा.
अशाप्रकारे सर्व फलाफल तळून घ्यावे. जनरली, फलाफल काकडीच्या सॉसबरोबर सर्व्ह करतात.
टीपा:
१) शक्यतो बेसन न घालता फक्त भिजलेल्या काबुली चण्याचे फलाफल करून पहावे. एक लहान गोळा गरम तेलात घालून पाहावा. जर गोळा तेलात फुटत असेल तरच बेसन घालावे.
२) फलाफल मध्यम आचेवरच तळावेत. मोठ्या आचेवर तळल्यास बाहेरून रंग लगेच येईल पण आतून कच्चे राहतील. तसेच मंद आचेवर तळल्यास फलाफल तेलात फुटू शकतात.
parcelly mhabje
ReplyDeletelooks good try kela pahike parcelly mhanje
ताई नमस्कार,
ReplyDeleteबरेच लोक english मध्ये (मराठी शब्द वापरून) प्रतीक्रिया लिहितात.
त्याचे कारण असे असू शकेल कि मराठीत कसें टाईप करावयाचे हे खूप लोकांना माहीत नसते.काल तुमच्या ब्लोगवर मी ह्याची माहिती दिली होती.पण पब्लिश झालेली दिसत नाही.पुन्हा एकदा हि माहिती खाली देत आहे.हि applications वापरावयास अत्यंत सोपी आहेत.
http://www.google.com/ime/transliteration/
http://www.baraha.com/
श्रीकांत टिल्लू
parsali mhnje kay????
ReplyDeleteHi Vaidihi,
ReplyDeletetuzi hi receipe khupach changali aahe, mi nakki karun pahin, pan ag "parsali" he kay aahe.
smita
Thanks. I love to eat Falafel whenever I go to Israel. There is a specific spoon (sacha) for it which I have but now have to find out where I kept to prepare Falafel.
ReplyDeletewhat is parsali?
ReplyDeletehi vaidehi..
ReplyDeleteWhat is mean by Parcely ..
Hello
ReplyDeleteParsley is an herb. It is used in many Italian and Mediterranean recipes. Just like we use Coriander in Indian recipes.
HI
ReplyDeletewhere i get parceli??
नमस्कार श्रीकांत
ReplyDeleteमाहितीसाठी आभार. वाचकांना कमेंट मराठीत पोस्ट करायला याचा उपयोग नक्कीच होईल.
You can get parsley in grocery stores like walmart, harris teeter.
ReplyDeletePlease trip la gheun jau shaku asha kahi dish or dry receipies tumhi taku shakal ka veglya columne madhe so amhala te follow karayala soppa jau shakel
ReplyDeleteParsley la kahi substitute mhanun vaparta yeil ka?
ReplyDeleteHi Mugdha,
ReplyDeleteParsley la substitute mhanun kothimbir wapru shakto. Parsley la ek vegla flavor asto. pan agadi nahi milalyas kothimbir waparavi.
the irony is...... I use parsley when don't find cilantro.
ReplyDeleteHi chakli bloggers, i must say this blog has helped me very much,i hav got married since last 5 months n i can make my hubby happy by making different recepies from chakli...thanks very much...
ReplyDeleteHi वैदेही
ReplyDeleteधन्यवाद हि रेसिपी आमच्याबरोबर शेअर केल्याबद्दल. खुंपच छान वाटली. नक्की ट्राय करेन.
रुपाली निकम'
Hi वैदेही,
ReplyDeleteमी काल फलाफल करायला घेतले . सारण चवीला चांगलं झालं होतं . पण तळायला घेतल्यावर तेलात फुटले. :(
काय चुकलं असावं ? चणे किती वेळ भिजवायचे ? मी आत्ता ही comment लिहिताना एक महत्वाची चूक लक्षात आली - मी कूकर ला एक शिट्टी काढली चण्यांना :)) तरीही details सांगशील का भिजवण्या बद्दल ? Thank you!
नुसतेच भिजवलेले चणे वापरायचे..शिट्टी काढायची नाही.. ६ ते ८ तासात चणे भिजतात.
Deleteखूप चांगली पाककृती आहे.
ReplyDeletekakdicha sause ksa bnvaycha ? nahitr khajurachi chatney or tomato sauce brobr chalel ka serve kel tr
ReplyDeleteNamaskar Asmita,
Deletekakdicha sauce recipe - http://chakali.blogspot.com/2012/04/tzatziki-sauce-falafel.html
मिश्रण रात्री करून ठेवले आणि सकाळी फ्राय केले तर चालेल का । सकाळी तळताना फुटणार नाहीत ना.
ReplyDeleteChalel.. pan olasar panamule besanache pith ghalave lagel.
Deletekabuli chanya chya aivaji kahi dusare vaparata yeil ka? Mazya mulala allergy aahe.
ReplyDelete