मालपुवा - Malpuva

Malpua in English वेळ: ४५ मिनिटे वाढणी: ८ ते १० मालपुवे साहित्य: मालपुवाची धिरडी १ कप मैदा ३/४ कप खवा २ टेस्पून रवा १ चिमुटभर बेक...

Malpua in English

वेळ: ४५ मिनिटे
वाढणी: ८ ते १० मालपुवे


indian sweet, malpua, north indian sweetसाहित्य:
मालपुवाची धिरडी
१ कप मैदा
३/४ कप खवा
२ टेस्पून रवा
१ चिमुटभर बेकिंग सोडा
दीड कप दुध (रूम टेम्प.)
१ चिमटी मीठ
२ चिमटी बडीशेप
१/२ कप तूप
साखर पाक
१ कप साखर
१ कप पाणी
१ टीस्पून वेलचीपूड
१ चिमटी केशर
सजावटीसाठी
२ टेस्पून पिस्ते, भरडसर चिरलेले
केशर

कृती:
१) एक मध्यम वाडगे घ्यावे. त्यात मैदा, रवा, खवा, दुध, आणि मीठ घालून मिक्स करावे. मिश्रण एकदम स्मूथ व्हावे म्हणून मिक्सरमध्ये १०-१५ सेकंद फिरवावे. हे मिश्रण १५ मिनिटे झाकून ठेवावे. त्यात बडीशेप घालून मिक्स करावे. मिश्रणाची कान्सीस्टन्सी इडलीच्या पिठाइतपत पातळ हवी. खूप घट्ट नको आणि एकदम पाणीसुद्धा नको.
२) साखरेचा पाक बनवण्यासाठी साखर, केशर आणि पाणी एकत्र करून पातेल्यात उकळत ठेवावे. ५ ते ६ मिनिटे मोठ्या आचेवर उकळी काढावी. पाकात चमचा बुडवून लहान ठिपका एका प्लेटमध्ये टाकावा. हा ठिपका ४-५ सेकंदातच हाताळण्यायोग्य होईल. अंगठा आणि पहिले बोट यात पाक धरून उघडझाप करा. आणि एक तार आली तर पाक तयार झाला असे समजावे. जर तार आली नाही तर अजून २-३ मिनिटे उकळी काढावी.
३) साखरेचा पाक तयार झाला कि एकदम मंद आचेवर हा पाक ठेवून द्यावा. गॅस बंद करू नये. पाक थोडा कोमट राहू द्यावा.
४) पाक तयार झाला कि लगेच धिरडी घालायला घ्यावीत. मिश्रणात बेकिंग सोडा घालून मिक्स करावे.
५) एक लहान फ्रायिंग पॅन गरम करून त्यात १ टेस्पून तूप घालावे. तूप वितळले कि एक डावभर मिश्रण घालून पातळसर धिरडे घालावे. मिडीयम-हाय फ्लेमवर दोन्ही बाजूनी लालसर शेकून घ्यावे.
६) तयार धिरडे गरम असतानाच पाकात घालावे. २ मिनिटे पाक मुरावायला ठेवावे. तयार मालपुवा प्लेटमध्ये काढून पिस्ता, केशर घालून लगेच सर्व्ह करा.
अशाप्रकारे सर्व मालपुवे तयार करा.

टीपा:
१) मालपुवा गरम असतानाच खावा. थंड झाल्यावर चव एकदम उतरते आणि पाक शोषल्याने मालपुवा फुगतो.
२) मी मालपुवा शालो फ्राय केला होता. पण मालपूवे भरपूर तुपात बनवतात. तुम्हाला आवडीप्रमाणे तूप कमी जास्त करता येईल. पण एकदम कमी तूपातही मालपुवा चांगला लागत नाही.
३) मालपुवा तूपतच बनवा, तेलात बनवू नका. तूपाऐवजी चालत असल्यास डालडामध्येही बनवू शकता.
४) मालपुवे पातळ बनवा. जाड मालपुवे वाईट लागत नाहीत पण पातळ असले कि जास्त छान लागतात.

Related

Sweet 8796401961105323256

Post a Comment Default Comments

  1. perfect reipe of malpua...will definitely make it...thanx for posting malpua ..recipe..

    ReplyDelete
  2. malpua chi dhiradi mhanaje??separate milte ka chitale madhe??
    ,shweta528

    ReplyDelete
  3. मालपुवा ची धिरडी म्हणजेच मालपुवा. पण घरी बनवायचे झाले तर त्याचे छोटे छोटे पॅनकेक्स बनवावे लागतात. त्यालाच मी धिरडी असे म्हटले आहे. या धिरड्यांना गोड चव नसते.साखरेचा पाक वेगळा बनवावा लागतो.

    ReplyDelete
  4. ok ok!!!
    shweta528

    ReplyDelete
  5. khup chan recipe ahe....... kharacha god avadnyaratala tar mejvanich ahe
    madhavi

    ReplyDelete
  6. Vaidehi ya recipe madhe khavyachya jagi kahi dusra wapru shakto ka aapan?

    ReplyDelete
  7. Hi Shilpa, khavyamule chav surekh lagte. pan khavyala substitute mhanun milk powder vaparu shaktes.

    Fresh ghari kelele Paneer ghalunahi malpua banavta yeto.

    ReplyDelete
  8. rava nahi vapraycha ka malpuva kartana

    ReplyDelete
  9. ha malpuva crispy hoto ka?

    ReplyDelete
  10. Hi...Tumhi Sahitya madhye 2tspoon Rava mention kel aahe pan krutit kutech tyacha ulekh nahi..to nakki vapryacha ki nahi...

    ReplyDelete
  11. Hello

    Pith bhijavtanach rava ghalaycha ahe. lihayche rahun gele hote. chuk point out kelyabaddal dhanyavad.

    ReplyDelete
  12. sakharecha pak na karta sakhar maida,rava yanchya mishranat ghatali tar chalel ka?

    ReplyDelete
  13. tyane chavit khup farak yeil
    paakamule dhiradi mausut lagtat.

    ReplyDelete
  14. Thanks Vaidehi for Malpua.
    I will tray.

    Mazyakade microwave nahiye. tar KAJU KATALI che misharan gas var kele tra nahi chalnar ka mazya husbandla kaju katali kup aavadate. PLS SANG.
    Thanks,
    DR.VINAYA

    ReplyDelete
  15. मैद्या एवजी गव्हाचे पीठ घेतले तर काय होईल ? आणि साखरे एवजी गुळ वापरला तर ?

    ReplyDelete
    Replies
    1. Hello Devika,

      Gavhache pith vaparle tari chalel pan chavit farak yeil barach.. Maida jast chhan lagto..
      Gulacha paak changala lagnar nahi.. sakharecha pakach hava.

      Delete

item