टोमॅटो कॅरट सूप - Tomato Carrot Soup

Tomato Carrot Soup in English वेळ: २५ मिनिट्स ४ जणांसाठी साहित्य: ८ मोठे टोमॅटो, जाडसर चिरून २ मोठी गाजरे, माध्यम चौकोनी तुकडे १ लहान...

Tomato Carrot Soup in English
वेळ: २५ मिनिट्स
४ जणांसाठी

tomato carrot soup, Healthy soup recipe, soup recipe, tomato soup, carrot soupसाहित्य:
८ मोठे टोमॅटो, जाडसर चिरून
२ मोठी गाजरे, माध्यम चौकोनी तुकडे
१ लहान कांदा, बारीक चिरून
४ लसूण पाकळ्या, बारीक चिरून
दीड टीस्पून ऑलिव्ह ऑईल
१/४ ते १/२ कप बेसिल पाने, बारीक चिरून
२ तमालपत्र
१/४ टीस्पून लाल तिखट
१ टीस्पून साखर (ऐच्छिक)
१/२ कप ताजा ऑरेंज ज्यूस (शक्यतो बिनसाखरेचा)
१/४ कप नारळाचे घट्ट दुध किंवा हेवी क्रीम
चवीपुरते मीठ
१/२ टीस्पून मिरपूड

कृती:
१) खोलगट नॉनस्टिक पॅनमध्ये तेल गरम करावे. त्यात तमालपत्र आणि लसूण घालून परतावे. ५-७ सेकंदानी कांदा घालावा. कांदा थोडासा पारदर्शक झाला कि गाजर घालावे.
२) गाजर घातल्यावर झाकण ठेवून गाजर नरम होईस्तोवर शिजवावे. नंतर टोमॅटोचे तुकडे घालून झाकण ठेवून शिजवावे. टोमॅटो मउसर झाले कि बेसिल पाने घालावीत. झाकण न ठेवता २-३ मिनिटे शिजवावे. गॅस बंद करून मिश्रण ५-१० मिनिटे कोमट होवू द्यावे.
३) तमालपत्र काढून टाकावी. गाजर-टोमॅटोचे मिश्रण मिक्सरमध्ये घालून बारीक पेस्ट करावी. हि पेस्ट गाळण्यातून गाळून घ्यावी. लागल्यास थोडे पाणी घालावे. नंतर गाळलेले सूप परत पातेल्यात घ्यावे. त्यात ऑरेंज ज्यूस घालावा. मीठ, साखर, आणि लाल तिखट घालावे. काही मिनिटे उकळवून त्यात क्रीम किंवा नारळाचे दुध घालावे. १-२ मिनिटे कमी आचेवर गरम करावे आणि लगेच सर्व्ह करावे.
सर्व्ह करताना लागल्यास थोडी मिरपूड घालावी.

Related

Winter 2621629185448389930

Post a Comment Default Comments

  1. Loved this combination.. very tempting soup.

    ReplyDelete
  2. Basil Che pans kasa asta

    ReplyDelete
  3. Basil che vividha prakar astat. chavila thodese tulashichya panasarkhe lagte.

    Fotochi link ithe detey.

    ReplyDelete
  4. besil che pan kuthe milel? tyala option mhanun kay wapru shakato?

    ReplyDelete
  5. Basil marketmadhye available asto pan tumhala tyachi chaukashi karavi lagel. Kinva tumhi dry basil leaves vaparu shakta. hi tumhala general stores madhye nakki milel.
    Dry basil vapartana per serving 2 chimatibharach vaparave.

    ReplyDelete
  6. Hi Vaidehi
    mi he soup karun pahile....ekadam apratim...ek number zale va sagalyana khup avadale...thnx for a jabari recipe....tu rosted corn and garlic chi recipe post karu shakashil ka??

    ReplyDelete
  7. Thank you Ashwini

    Roasted corn and garlic chi recipe nakki post karen.

    ReplyDelete
  8. Hi
    aga mala roasted corn n garlic soup chi recipe havi aahe

    ReplyDelete
  9. या कृतीने काल सूप केलं. छान झालं. पण ऑरेंज ज्यूस घालायचं प्रयोजन नक्की लक्षात न आल्याने अगदी थोडा घातला. तेवढ्याने सुद्धा खूप आंबट झालं सूप. पुढल्यावेळी ऑज्यु न घालताच करेन कारण एकूण चव आवडली सूपची. धन्यवाद :)

    ReplyDelete
    Replies
    1. कमेंटसाठी धन्यवाद. ऑरेंज ज्यूसमुळे छान फ्लेवर येतो. जर टॉमेटो जास्त आंबट असेल तर ऑरेंज ज्यूस कमी किंवा घातला नाही तरी चालेल.

      Delete

item