व्हाईट सॉस - White Sauce

White Sauce in English वेळ: १० मिनिटे साधारण १ कप व्हाईट सॉस साहित्य: २ टेस्पून बटर ३ टेस्पून मैदा दीड कप गरम दूध २ चिमटी मीठ १ ...

White Sauce in English

वेळ: १० मिनिटे
साधारण १ कप व्हाईट सॉस

साहित्य:
२ टेस्पून बटर
३ टेस्पून मैदा
दीड कप गरम दूध
२ चिमटी मीठ
१ टीस्पून साखर

कृती:
१) पॅनमध्ये बटर गरम करावे. बटर वितळले कि मैदा घालून मध्यम आचेवर एक-दोन मिनिटे परतावे. सतत परत राहा. परतायचे थांबल्यास मैदा जळेल. मैद्याचा रंग हलका गुलाबी आला पाहिजे. जास्त गडद रंग आल्यास सॉसचाही रंग बदलेल.
२) मैदा परतल्यावर त्यात गरम दुध घालून ढवळावे म्हणजे गुठळ्या होणार नाहीत. सॉस दाट होईतोवर ढवळावे.
३) मीठ आणि साखर घालून मिक्स करावे. गॅस बंद करून व्हाईट सॉस लगेच वापरावा.

Related

Sauce 5310077928489901631

Post a Comment Default Comments

  1. where i can use this sauce?

    ReplyDelete
  2. White sauce can be used in baked vegetables, soups and various Italian/continental dishes.

    ReplyDelete
  3. Thanks for posting this recipe. It will be great if you can put recipe of Mayonise?

    ReplyDelete
  4. white sauce kiti divas vapru shakto

    ReplyDelete
  5. Hi Mamta

    Mazyamate white sauce kelyavar shakyato lagech vaprava. Karan tyat maida asalyas to thijto. Pan jar karun thevaycha zalyas 2 divas fridge madhye tikto. Vaparaychya veles changle ghotun ghyave ani mand achevar thode heat karave.

    ReplyDelete

item