भरली कारली - Bharli Karli

Stuffed Karela in English वाढणी: २ ते ४ जणांसाठी वेळ: २५ मिनिटे साहित्य: ४ कोवळी कारली तळण्यासाठी तेल ::सारण:: २ टेस्पून भाजलेले त...

Stuffed Karela in English

वाढणी: २ ते ४ जणांसाठी
वेळ: २५ मिनिटे

stuffed karela, stuffed bitter gourd, karela recipe, karlyachi bhaji
साहित्य:
४ कोवळी कारली
तळण्यासाठी तेल
::सारण::
२ टेस्पून भाजलेले तिळ
२ टेस्पून भाजलेले बेसन (१ टेस्पून तेलावर भाजावे)
२ टेस्पून भाजलेले खोबरे
१ टिस्पून धणेपूड
१ टिस्पून जिरेपूड
१/२ टिस्पून आमचूर
१/२ टिस्पून लाल तिखट
१/४ टिस्पून हिंग
१/४ टिस्पून हळद
१ टिस्पून बडिशेप
१ टिस्पून साखर
१ टिस्पून खसखस (ऐच्छिक)
चवीनुसार मिठ

कृती:
१) कारली धुवून घ्यावी. कारल्याची खरखरीत पाठ हलकेच किसणीने किसून प्लेन करून घ्यावी. प्रत्येक कारल्याला उभा छेद करून घ्यावा आणि बिया काढून साफ करावे. आतल्या बाजूने मिठ चोळून ठेवावे.
२) तिळ खोबरं एकत्र कुटून घ्यावे. त्यात धणेजिरेपूड, आमचूर, तिखट, साखर, भाजून कुटलेली खसखस, तेलावर भाजलेले बेसन आणि अगदी थोडे मिठ घालून मिक्स करावे (कारल्याला चोळलेले मिठ लक्षात ठेवावे)
३) मिश्रण कारल्यात भरून कारल्याला गच्च दोरा बांधावा आणि कारली कुरकूरीत तळावी.
वाढण्यापूर्वी दोरा काढून टाकावा. भरली कारली आमटी भाताबरोबर छान लागते. पोळीबरोबर खायचे झाल्यास बरोबर आमटी किवा तत्सम पातळ पदार्थ घ्यावा.

टीप:
१) कारली लहान पॅनमध्ये थोडे जास्त तेल घालून शालो फ्राय करता येतात. जास्त तेलाची फोडणी करून त्यात कारली परतून झाकावी. १० मिनीटे अधून मधून बाजू बदलावी आणि चमच्याने जरा प्रेस करत राहावे म्हणजे निट शिजले जाईल.
२) शक्यतो लहान व कोवळी कारली वापरावीत. लहान कारली लवकर शिजतात आणि वाढायला सोपी जातात. साधारण एक कारले एका व्यक्तीसाठी पुरेसे होते.

Related

तिळकूट - Tilkut

Tilkut in English वेळ: २५ मिनिटे साधारण १ ते दीड कप चटणी साहित्य: १ कप कारळे तिळ १/४ कप भाजलेले शेंगदाणे १ चमचा लाल तिखट १ वाटी कोरडा कढीपत्ता चवीपुरते मिठ १ चमचा गूळ १ चमचा चिंच १/४ कप किसलेले ...

साबुदाणा चिकवड्या - Sabudana Papad

Chikwadya in English साधारण २० मध्यम चिकवड्या साहित्य: १/२ कप साबुदाणा १/२ टीस्पून मीठ साबुदाणा भिजवायला पुरेसे पाणी कृती: १) साबुदाणा भांड्यात ठेवून त्यात साबुदाण्याच्या पातळीवर अर्धा इंच य...

पाती कांद्याची भजी - Spring Onion Pakoda

Spring Onion Pakoda in English वेळ: २० मिनीटे वाढणी: ३ ते ४ जणांसाठी साहित्य: अर्धी जुडी पाती कांदा (१२ ते १५ काड्या) १/४ चमचा ओवा २-३ हिरव्या मिरच्या, बारीक चिरून १/२ लहान चमचा हळद १/४ चमचा हिंग १...

Older Post Broccoli Soup

Post a Comment Default Comments

  1. pan karli kadu lagt nahi ka?

    ReplyDelete
  2. karlyacha kadvat pana far janvat nahi.. agadi kinchit lagto.

    ReplyDelete
  3. my favourite dish mala karlychi bhaji khup aavadte.

    ReplyDelete
  4. baghunch khavi vatte aani mala karlychi bhaji khup ,khup aavdate

    ReplyDelete
  5. anakhi karlyachi receipes asatil tar please post kara.........

    ReplyDelete
  6. Kamal... Sollliid zali bhaji... Pan bharlya vangya sarkhi rassa bhaji kashi karaych?

    ReplyDelete
  7. Kamal... Sollid zali bhaji. Pan bharlya vangya sarkhi rassa kashi karta yeil.?

    ReplyDelete
  8. Thanks Ketan

    Shakyato karalyacha rassa kadu honyachi shakyata aste. Pudhil paddhatine kelyas changali lagel.
    Karli atun saaf karavi. Atalya bajus mith cholun 1/2 te 1 tas thevun dyavi. nantar pilun pani kadhave. thodavel panyat ukalavavi. nantar stuff karun talavi. rassa vegla karun tyat thodavel talaleli karli ghalun ukali kadhavi.

    ReplyDelete
  9. Wow mala tr khup easy n mast vatle n karle maje fav aahe te kasehi aso te chanch lagte

    ReplyDelete
  10. ek dam mast lagtat

    ReplyDelete

emo-but-icon
:noprob:
:smile:
:shy:
:trope:
:sneered:
:happy:
:escort:
:rapt:
:love:
:heart:
:angry:
:hate:
:sad:
:sigh:
:disappointed:
:cry:
:fear:
:surprise:
:unbelieve:
:shit:
:like:
:dislike:
:clap:
:cuff:
:fist:
:ok:
:file:
:link:
:place:
:contact:

Search Recipes

RecentCommentsPopular

Recent

Daliya Kheer

Time: 15 to 20 minutes Portion: 1 portion  Ingredients: 30 gm Daliya (Cracked Wheat) 30 gm Jaggery ¼ tsp Cardamom Powder 30 ml Milk 5 ml Ghee 15 gm Fresh Coconut scraped Description: 1. Pressure...

Soya Granules Upma

Soya Granules Upma Time: 10 to 15 minutes Serving: 1  Ingredients:  35 grams Soy Granules 1 tsp Ghee ¼ tsp Cumin seeds Pinch of Hing 4 to 5 Curry leaves 1 or two Green Chilli, finely ...

स्टफ पोटॅटो बोट्स - Stuffed Potato Boats

Stuffed Potato in English वेळ: २५ मिनीटे २ ते ३ जणांसाठी साहित्य: ४ बटाटे (कच्चे) तळण्यासाठी तेल स्टफिंगसाठी २५० ग्राम पनीर १/२ चमचा चाट मसाला थोडेसे मीठ इतर साहित्य: १/२ वाटी स्वीट कॉर्न, वाफवून...

Stuffed Potato Boats

Potato Boats in Marathi Time: 25 minutes Yield: 2 to 3 servings Ingredients: 4 medium potatoes Oil for frying ::::For Stuffing:::: 250 gram paneer 1/2 tsp chaat masala Salt to taste ::::Other Ing...

Boondi Ladu

Boondi Ladu वेळ: ३० ते ४० मिनीटे वाढणी: ८ मध्यम लाडू साहित्य: १ कप बेसन १ कप साखर वेलची पूड केशर तळण्यासाठी तूप किंवा तेल बुंदी पाडायला आणि तळायला असे दोन झारे कृती: १) बेसनात १ चमचा तूप घालाव...

Comments

Vaidehi Bhave:

Nahi. Condense milk ghatta aste. Dudh ghatle tar batter patal hoil. Tasech ha eggless cake ahe.

Vaidehi Bhave:

Thank you for your comment.

Vaidehi Bhave:

Sorry for replying late. Thoda dudh ghalun shijavave. Kadhikadhi naral thoda dry asel tar sakhar virghalat nahi. tyamule thoda olsarpana yayla dudh ghalave.

Like Chakali!

item