दह्यातील काकडी कोशिंबीर - Cucumber Yogurt Raita

Cucumber Raita in English वाढणी: २ ते ३ जणांसाठी वेळ: १० मिनीटे साहित्य: १ कप बारीक चोचवलेली काकडी (आधी काकडी सोलावी) ३/४ कप दही, घोट...

Cucumber Raita in English

वाढणी: २ ते ३ जणांसाठी
वेळ: १० मिनीटे

cucumber raita, kakdichi koshimbir, dahyatil kakdi koshimbir, Indian raita, biryaniसाहित्य:
१ कप बारीक चोचवलेली काकडी (आधी काकडी सोलावी)
३/४ कप दही, घोटून
१ हिरवी मिरची, बारीक चिरून
१/४ कप कोथिंबीर, बारीक चिरून
१ टिस्पून तूप
२ चिमटी जिरे
चवीपुरते मिठ

कृती:
१) चोचवलेली काकडी आणि दही एकत्र करावे. मिरची आणि थोडेसे मिठ एकत्र करून चुरडावे आणि दही-काकडीमध्ये घालावे.
२) लहान कढल्यात तूप गरम करून जिरे फोडणीस घालावे. जिरे तडतडले कि दही-काकडीत घालावे.
३) कोथिंबीर आणि लागल्यास मिठ घालून मिक्स करावे.
हे रायते रोजच्या जेवणात तोंडीलावणी म्हणून छान लागते.

टीपा:
१) रायते अजून तिखट हवे असल्यास अजून थोडी मिरची चुरडून घालावी.
२) सर्व दही एकदम काकडीत घालू नये. थोडे घालून मिक्स करून लागेल तसे दही घालावे. जर तुम्हाला जास्त दही हवे असेल तर अजून दही घातले तरीही चालेल.
३) १ ते २ टेस्पून दाण्याचा कूटही घालू शकतो.

Related

Raita 6343739888116321088

Post a Comment Default Comments

item