गवारीची भाजी - Gawarichi Bhaji

Gawarichi Bhaji in English वेळ: पूर्वतयारी १५ मिनीटे । पाकृसाठी २० मिनीटे वाढणी: २ ते ३ जणांसाठी साहित्य: पाव किलो गवार फोडणीसाठी:- १...

Gawarichi Bhaji in English

वेळ: पूर्वतयारी १५ मिनीटे । पाकृसाठी २० मिनीटे
वाढणी: २ ते ३ जणांसाठी

gawarichi bhaji, gavar bhaji, bawchi bhaji, guar sabzi, everyday cooking, Maharashtrian vegetables, bhaji recipe, shenganchi bhajiसाहित्य:
पाव किलो गवार
फोडणीसाठी:- १ टेस्पून तेल, २ चिमटी मोहोरी, १ चिमटी जिरे, २ चिमटी हिंग, १/४ टिस्पून हळद, १/४ टिस्पून लाल तिखट
१ मध्यम बटाटा, सोलून मध्यम फोडी कराव्यात (टीप १ व २)
२ ते ४ टेस्पून ताजा नारळ
१ टेस्पून दाण्याचा कूट
२ टिस्पून गूळ किंवा चवीपुरता
१/२ टिस्पून गोडा मसाला
चवीपुरते मिठ

कृती:
१) गवार स्वच्छ धुवून घ्यावी. प्रत्येक गवारीची दोन्ही बाजूची देठं मोडावीत आणि शिर असेल तर काढून टाकावी. गवारीचे १/२ ते १ इंचाचे तुकडे मोडून घ्यावेत.
२) गवार कूकरमध्ये २ शिट्ट्या करून वाफवून घ्यावी. वाफवताना गवारीमध्ये पाणी घालू नये. (वाफवण्यासाठी कूकरच्या तळाशी १ इंच पाणी असावे. गवार कूकरच्या आतील डब्यात ठेवावी व या डब्यात पाणी घालू नये.)
३) कढईत तेल गरम करावे. मोहोरी, जिरे, हिंग, हळद घालून फोडणी करावी. प्रथम बटाटे फोडणीस टाकावे. २-३ वाफा काढून बटाटा शिजू द्यावा. बटाटा ८० ते ९० % शिजला कि वाफवलेली गवार घालावी. निट मिक्स करावे.
४) लाल तिखट, गोडा मसाला, नारळ, दाण्याचा कूट आणि थोडे मिठ घालावे. मध्यम आचेवर १-२ वाफा काढाव्यात. नंतर गूळ घालून १ वाफ काढावी.
हि भाजी पोळीबरोबर किंवा गरमगरम तूप-वरण-भाताबरोबर झकास लागते.

टीप:
१) शिजवलेला बटाटाही वापरू शकतो. फक्त बटाटा शिजवून थोडावेळ फ्रिजमध्ये ठेवावा. गवार आणि बटाटा एकत्रच फोडणीस घालावे, बटाटा शिजलेला असल्या कारणाने अजून शिजवायची गरज नाही.
२) बटाट्याऐवजी काळे वाटाणे गवारीच्या भाजीत अधिक छान लागतात. जर काळे वाटाणे वापरायचे असतील तर ७-८ तास वाटाणे पाण्यात भिजत ठेवावेत व कूकरमध्ये शिजवून घ्यावेत.
३) हि भाजी थेट कूकरमध्येही फोडणीस टाकू शकतो, म्हणजे गवार वेगळी शिजवायची गरज नाही. लहान कूकरमध्ये फोडणी करून घ्यावी. त्यात मोडलेली गवार, बटाटा/ भिजवलेले काळे वाटाणे फोडणीस टाकावे. इतर साहित्यही घालावे व थोडे पाणी घालावे. २ ते ३ शिट्ट्या होवू द्याव्यात. वाफ मुरली कि कूकर उघडून वाटल्यास १ उकळी काढावी.

Related

तूप - Clarified butter at home

Clarified Butter (ghee) in Englishवेळ: २५ ते ३० मिनिटे२.२५ पौंड तूप (साधारण १ किलो तूप)साहित्य:३ पौंड अनसॉल्टेड बटर (मीठ विरहित)कृती:१) बटर रूम टेम्परेचरला येउ द्यात. बटर एका मोठ्या खोलगट अशा जाड बुडा...

बेक्ड कृटॉन्स (गार्लिक फ्लेवर्ड) - Garlic Croutons

Croutons in English वेळ: २० मिनिटे वाढणी: ४ ते ५ सर्व्हिंग्स साहित्य: ४ ब्रेड स्लाईस २ टेस्पून ऑलिव्ह ऑइल २ ते ३ चिमटी मीठ १/२ टीस्पून लसूण पावडर (ऐच्छिक) १/२ टीस्पून इटालियन हर्ब्ज (ड्राय) कृती: १...

गोटा भजी - Gota Bhaji Methi Gota

Gota Bhaji in English वेळ: २५ ते ३० मिनीटे साधारण १५-१८ मध्यम भजी साहित्य: १/२ कप बेसन (टिप १) १/२ कप मूगडाळ पीठ (टिप १) १/४ कप कसुरी मेथी १ टेस्पून लसूण पेस्ट १/२ कप दही किंवा लागेल तेवढे मसाले: २ ल...

Post a Comment Default Comments

  1. Chakali recipies are very interesting.The monthly calender is also very usefull for newly married couple.

    ReplyDelete
  2. Can you translate the recipe in english please.

    ReplyDelete
  3. mi kal pahilyanda try kela ..khup must jali....saglyana khup aawadli ..Kay tari vegle pan must

    ReplyDelete
  4. Hi,
    I really love your recipies. They are exactly how my mom cooked food. I tried this recipie, but everytime I cook the gavar in cooker,it gets over cooked and almost becomes a mash, how do I avoid it. Also at what stage should you add the jaggery?

    ReplyDelete
  5. Hi Ketan

    Thanks for your comment.
    When you pressure cook gawar, do not add water in the inside container. And pressure cook only upto two whistles.
    You can make this without using pressure cooker. (It is a little time-consuming process, but you will be able to check the doneness)
    Heat oil in kadai, prepare the tempering. Add washed gawar beans. Add salt and other ingredient except jaggery and goda masala. Cover the kadai with a steel plate filled with some water. cook gawar beans over low heat. Stirring occasionally. When gawar beans are almost done, add jaggery and goda masala. Cook for few minutes. and serve hot with chapati.

    ReplyDelete
  6. hi Vaidehi,
    I am going to follow ur recipe....using cooker and also without cooker for gawar.

    Devanand

    ReplyDelete

emo-but-icon
:noprob:
:smile:
:shy:
:trope:
:sneered:
:happy:
:escort:
:rapt:
:love:
:heart:
:angry:
:hate:
:sad:
:sigh:
:disappointed:
:cry:
:fear:
:surprise:
:unbelieve:
:shit:
:like:
:dislike:
:clap:
:cuff:
:fist:
:ok:
:file:
:link:
:place:
:contact:

Search Recipes

RecentCommentsPopular

Recent

Daliya Kheer

Time: 15 to 20 minutes Portion: 1 portion  Ingredients: 30 gm Daliya (Cracked Wheat) 30 gm Jaggery ¼ tsp Cardamom Powder 30 ml Milk 5 ml Ghee 15 gm Fresh Coconut scraped Description: 1. Pressure...

Soya Granules Upma

Soya Granules Upma Time: 10 to 15 minutes Serving: 1  Ingredients:  35 grams Soy Granules 1 tsp Ghee ¼ tsp Cumin seeds Pinch of Hing 4 to 5 Curry leaves 1 or two Green Chilli, finely ...

स्टफ पोटॅटो बोट्स - Stuffed Potato Boats

Stuffed Potato in English वेळ: २५ मिनीटे २ ते ३ जणांसाठी साहित्य: ४ बटाटे (कच्चे) तळण्यासाठी तेल स्टफिंगसाठी २५० ग्राम पनीर १/२ चमचा चाट मसाला थोडेसे मीठ इतर साहित्य: १/२ वाटी स्वीट कॉर्न, वाफवून...

Stuffed Potato Boats

Potato Boats in Marathi Time: 25 minutes Yield: 2 to 3 servings Ingredients: 4 medium potatoes Oil for frying ::::For Stuffing:::: 250 gram paneer 1/2 tsp chaat masala Salt to taste ::::Other Ing...

Boondi Ladu

Boondi Ladu वेळ: ३० ते ४० मिनीटे वाढणी: ८ मध्यम लाडू साहित्य: १ कप बेसन १ कप साखर वेलची पूड केशर तळण्यासाठी तूप किंवा तेल बुंदी पाडायला आणि तळायला असे दोन झारे कृती: १) बेसनात १ चमचा तूप घालाव...

Comments

Vaidehi Bhave:

Nahi. Condense milk ghatta aste. Dudh ghatle tar batter patal hoil. Tasech ha eggless cake ahe.

Vaidehi Bhave:

Thank you for your comment.

Vaidehi Bhave:

Sorry for replying late. Thoda dudh ghalun shijavave. Kadhikadhi naral thoda dry asel tar sakhar virghalat nahi. tyamule thoda olsarpana yayla dudh ghalave.

Like Chakali!

item