व्हेजिटेबल कोर्मा - Vegetable Korma

Vegetable Korma in English वेळ: ३० मिनीटे वाढणी: ४ जणांसाठी साहित्य: दोन कप कॉलीफ्लॉवरचे मध्यम तुरे १/२ कप मटार २ मध्यम गाजरं, लहान ...

Vegetable Korma in English

वेळ: ३० मिनीटे
वाढणी: ४ जणांसाठी

paneer korma, korma curry recipe, vegetable korma, shahi korma, korma recipe, Indian curry recipesसाहित्य:
दोन कप कॉलीफ्लॉवरचे मध्यम तुरे
१/२ कप मटार
२ मध्यम गाजरं, लहान चौकोनी तुकडे
१/२ कप फरसबीचे तुकडे (२ इंच तुकडे)
१/२ कप पनीरचे चौकोनी तुकडे (ऐच्छिक)
१/२ कप कांदा, बारीक चिरून
१/२ कप टोमॅटो, बारीक चिरून
५ ते ६ काजू
१ टिस्पून गरम मसाला
फोडणीसाठी: २ टेस्पून तेल, ३-४ लवंगा, १/८ टिस्पून मोहोरी, १/४ टिस्पून जिरे, चिमूटभर हिंग, १/४ टिस्पून हळद, १/२ टिस्पून लाल तिखट
१ टिस्पून लसूण पेस्ट
१ टिस्पून आले पेस्ट
१ टिस्पून धणेपूड
१/२ कप नारळाचे दूध
१/२ टिस्पून साखर
चवीपुरते मिठ

कृती:
१) कॉलीफ्लॉवरचे तुकडे, मटार, गाजराचे तुकडे, फरसबीचे तुकडे मायक्रोवेव सेफ भांड्यात घ्यावेत. भाज्या बुडतील एवढे पाणी घालावे. १ टिस्पून मिठ घालून मिक्स करावे. मायक्रोवेवमध्ये भाज्या अर्धवट शिजवून घ्याव्यात. (मी भाज्या ५ मिनीटे हाय पॉवरवर शिजवल्या होत्या)
२) कढईत तेल गरम करावे. त्यात लवंग आणि काजू घालून काही सेकंद परतावे. नंतर मोहोरी, जिरे, हिंग, हळद आणि लाल तिखट घालून फोडणी करावी. लसूण पेस्ट परतावी.
३) लसूण पेस्ट परतल्यावर कांदा घालून खमंग परतावा. नंतर टोमॅटो घालावा आणि टोमॅटो एकदम मऊ होईपर्यंत परतावे.
४) नंतर अर्धवट शिजवलेल्या भाज्या घालाव्यात तसेच थोडे (साधारण १/२ कप) पाणी घालावे. गरम मसाला आणि धणेपूड घालावी. झाकण ठेवून भाज्या शिजू द्याव्यात. नंतर नारळाचे दूध, आलेपेस्ट आणि पनीरचे तुकडे घालावे. मध्यम आचेवर २ मिनीटे उकळी काढावी. चवीपुरते मिठ आणि साखर घालावी.
गरमागरम कोर्मा पोळी, पुरी किंवा रोटी बरोबर सर्व्ह करावा.

टीप्स:
१) कोर्मा जर थोडा रस्सेदार केला तर भाताबरोबरही छान लागतो.
२) जर मायक्रोवेव नसेल तर पातेल्यात पाणी उकळवावे. त्यामध्ये भाज्या घालून १ मिनीटभर उकळी काढावी. गॅस बंद करावा आणि पातेल्यावर झाकण ठेवून वाफेवर भाज्या अर्धवटच शिजवाव्यात.
३) कांदा आणि टोमॅटो एकदम बारीक चिरावा.
४) पनीर जर फ्रोजन असेल तर तुकडे करून थोडावेळ गरम पाण्यात घालून ठेवावे. नरम झाले कि पाण्याबाहेर काढावे.
५) आवडीनुसार अजून दुसर्‍या भाज्याही यामध्ये घालू शकतो (उदा. बटाटा)
६) भाज्यांचे प्रमाण आवडीनुसार कमी-जास्त करावे.

Labels:
Vegetable Korma, Korma curry recipe, Indian Curry, Mixed vegetable curry

Related

Rassa Bhaji 5211637539032605354

Post a Comment Default Comments

 1. नमस्कार.

  काल करून पाहिला असा कोर्मा. मस्तच झाला होता. अशी मिक्स भाजी मी पहिल्यांदाच केली. मला तिखट चालत नाही म्हणून तिखट मात्र टाकलं नव्हतं पण चव छानच होती.

  ReplyDelete
 2. aajach kela. Coconut milk navte mhanoon 3 chamache sour cream takle. It turned out really great. Tumchi pratyek receipe zakkas hote.

  Sushmita

  ReplyDelete
 3. Hi Vaidehi....
  I have learned cooking many dishes from your blog. . My family just loves all of them. I have tried this Veg Korma many a times ... and every time i have received complements from everyone. Thanks a lot for teaching me how to cook.

  ReplyDelete
 4. Hi Priyanka

  thanks for your comment.

  ReplyDelete
 5. वैदेही ताई तुझ्या रेसिपीज खुप छान असतात मला त्या बनवायलाही खुप मजा येते आणि घरीही सगळे आवडीने खातात
  THANK YOU TAI !

  ReplyDelete
 6. Hello Vaidehi,
  Tumchi Kolhapuri Misal kalach banavali hoti,sasubhai & Navryakadun Tarif milali,thank you.

  ReplyDelete

emo-but-icon

Search Recipes

Like Chakali!

item