बिटाचा ज्युस - Beet Root Juice

Beet Root Juice in English वेळ: १५ मिनीटे वाढणी: २ ग्लास साहित्य: १ बीट, मध्यम १ टोमॅटो, मध्यम १ गाजर, मध्यम १/३ कप पाणी १/४ टिस्प...

Beet Root Juice in English

वेळ: १५ मिनीटे
वाढणी: २ ग्लास

beetroot juice, tomato juice, Carrot juice, beetacha juiceसाहित्य:
१ बीट, मध्यम
१ टोमॅटो, मध्यम
१ गाजर, मध्यम
१/३ कप पाणी
१/४ टिस्पून जिरेपूड
मिठ साखर चवीनुसार
१ टिस्पून लिंबाचा रस (ऐच्छिक)

कृती:
१) बिट आणि गाजर प्रेशर कूकरमध्ये १ शिट्टी होईपर्यंत शिजवावे (टीप १). नंतर गाजर आणि बीटाचे मध्यम आकाराचे तुकडे करावेत. टोमॅटोसुद्धा मध्यम चिरून घ्यावा.
२) बिट, गाजर आणि टोमॅटो मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यावे. अगदी गरज वाटली तरच थोडेसे पाणी घालावे.
३) स्वच्छ कापडातून बिट-गाजर-टोमॅटोचे वाटण घट्ट पिळून गाळून घ्यावे.
४) या ज्युसमध्ये जिरेपूड आणि मिठ घालून मिक्स करावे. यामध्ये साखर आणि लिंबाचा रस घालावा (टीप २).

टीप:
१) बीट आणि गाजर कच्चे वापरले तरीही चालेल.
२) ज्युसमध्ये कदाचित साखर घालावी लागणार नाही. बिटाचा गोडपणा पुरेसा होईल तसेच जर टोमॅटोची चव गरजेपुरती आंबट असेल तर लिंबाचा रसही वापरावा लागणार नाही.

Related

Marathi 8881355937738183515

Post a Comment Default Comments

  1. Healthy receipe must try !!!

    sulakshana

    ReplyDelete
  2. hi,

    juice galalyavar rahilela chotha takun dyava ki tyacha kuthe vapar karta yeil?

    Pranjali

    ReplyDelete
  3. Nmaskar pranjali

    uralelya chothyamadhye ukadlela batata ani matar ghalun pattice karu shakto
    tasech mishra bhajyanche thalipith suddha chhan lagel.

    ReplyDelete
  4. Tai
    mala beet root soup chi recipe havi hote

    plz tumcha kade asel tar post karana

    ReplyDelete

item