मंचुरीयन मश्रुम करी - Mushroom Curry

Mushroom Curry in English ३ जणांसाठी वेळ: ३० मिनीटे साहित्य: मश्रुम करीसाठी: १२ बटन मश्रुम, उभे मध्यम काप २ टिस्पून तेल १ पाती कांद...

Mushroom Curry in English

३ जणांसाठी
वेळ: ३० मिनीटे

indian chinese, mushroom curryसाहित्य:
मश्रुम करीसाठी:
१२ बटन मश्रुम, उभे मध्यम काप
२ टिस्पून तेल
१ पाती कांदा, बारीक चिरून (थोडा हिरवा भाग सजावटीसाठी)
३ लसूण पाकळ्या, ठेचलेले
२ टिस्पून आलेपेस्ट
१ लहान हिरवी मिरची, उभी चिरून
१ टिस्पून सोया सॉस (मी ching's chilli sauce' वापरला होता)
१/४ टिस्पून विनिगर
दिड कप पाणी किंवा वेजिटेबल स्टॉक
२ टेस्पून कॉर्न स्टार्च किंवा कॉर्न फ्लोर
चवीपुरते मिठ
भातासाठी:
१ कप तांदूळ
१/२ टिस्पून मिठ
२ ऑलस्पाइस बॉल्स

कृती:
१) तांदूळ धुवून घ्यावे आणि १५ मिनीटे निथळत ठेवावे. २ कप पाणी गरम करून त्यात मिठ आणि फ्लेवरसाठी ऑलस्पाइस बॉल्स घालावेत. पाणी उकळले कि त्यात तांदूळ घालून मोकळा भात शिजवून घ्यावा.
२) पॅनमध्ये तेल गरम करून त्यात आले पेस्ट, हिरवी मिरची आणि लसूण घालून परतावे. पाती कांद्याचा पांढरा भाग घालून काही सेकंद परतावे. नंतर सोया सॉस आणि वेजिटेबल स्टॉकमधील १ कप स्टॉक घालून उकळी येऊ द्यावी.
३) वेजिटेबल स्टॉकला उकळी येईस्तोवर एका बोलमध्ये उरलेला १/२ कप स्टॉक आणि कॉर्न स्टार्च घालून मिक्स करावे. वेजिटेबल स्टॉकला उकळी आली कि त्यात हे मिश्रण घालून मध्यम आचेवर गरम होवू द्यावे. जर तुम्हाला हा सॉस घट्ट करायचा असेल तर २ टेस्पून पाण्यात १ टिस्पून कॉर्न स्टार्च घालून हे मिश्रण गरम सॉसमध्ये घालून थोडावेळ उकळी येऊ द्यावी.
४) या करीमध्ये मश्रुम आणि किंचीत मिठ घालावे. विनीगर घालून १ ते २ मिनीटं शिजू द्यावे.
एका बोलमध्ये गरम भात घालावा त्यावर तयार मश्रुम करी घालावी. पातीकांद्याने सजवून सर्व्ह करावे.

Labels:
Mushroom Curry, Indian Chinese Mushroom Curry

Related

Mushroom 4264335907045717877

Post a Comment Default Comments

emo-but-icon

Search Recipes

Like Chakali!

item