कढी पकोडे - Kadhi Pakoda
कढी पकोडे -Kadhi Pakode/Pakoras in English साहित्य: पकोडा १/२ कप बेसन पिठ १/२ कप कांदा, बारीक चिरून १/२ कप मेथी, बारीक चिरून चवीपुरत...
https://chakali.blogspot.com/2009/04/kadhi-pakoda.html
कढी पकोडे -Kadhi Pakode/Pakoras in English
साहित्य:
पकोडा
१/२ कप बेसन पिठ
१/२ कप कांदा, बारीक चिरून
१/२ कप मेथी, बारीक चिरून
चवीपुरते मिठ
१/४ टिस्पून बेकिंग सोडा
१ टिस्पून ओवा
१/२ टिस्पून जिरे
१ टेस्पून किसलेले आले
१ टिस्पून लाल तिखट
१/४ टिस्पून हळद
तळण्यासाठी तेल
कढीसाठी
१ कप दही
१/४ कप बेसन
२ टेस्पून तेल
१/२ टिस्पून मेथी दाणे
१/२ टिस्पून हळद
३-४ कढीपत्ता पाने
१ टिस्पून लाल तिखट
१ सुकी लाल मिरची
२ टेस्पून कोथिंबीर
चवीपुरते मिठ
कृती:
प्रथम पकोड्यांचे पिठ भिजवून तयार ठेवावे, नंतर कढी बनवावी. कढी उकळत असताना दुसर्या गॅसवर पकोडे तळायला घ्यावेत. पकोडे तळले कि उकळत्या कढीत घालावेत.
पकोड्यांचे पिठ भिजवण्यासाठी, एका भांड्यात पकोड्यासाठीचे सर्व साहित्य एकत्र करावे. थोडे पाणी घालून घट्टसर भिजवावे. झाकून ठेवावे आणि कढी करायला घ्यावी.
कढी:
१) दही घोटून घ्यावे. त्यात बेसन पिठ घालून परत घोटावे. त्यात गरजेनुसार पाणी घालून ताक बनवून घ्यावे. चवीपुरते मिठ घालावे.
२) एका खोलगट पॅनमध्ये २ टेस्पून तेल गरम करावे. त्यात मेथी दाणे घालून परतावे. लाल मिरची, हळद आणि कढीपत्ता घालून काही सेकंद परतावे. नंतर बेसन घातलेले ताक त्यात घालून ढवळावे. लाल तिखट घालावे. मध्यम आचेवर कढी उकळू द्यावी. उकळी येईस्तोवर ढवळावे.
पकोडे:
३) कढी उकळायला लागली कि आच मंद करा. आणि दुसर्या गॅसवर पकोडे तळायला घ्या. मिडीयम हाय हिट वर छोटे छोटे पकोडे तळून घ्या. तळलेले पकोडे लगेच कढीत घाला. एकदा ढवळून पॅनवर झाकण ठेवा आणि साधारण २० मिनीटे मंद आचेवर कढी उकळू द्या. कढी उकळताना मधेमधे ढवळा.
कोथिंबीरीने सजवून भाताबरोबर सर्व्ह करा.

It turned out very good, but pakoda soaked all the kadhi till dinner time and I had to make extra kadhi to pour in it.
ReplyDeleteIs it okey to keep these kadhi and pakoda separate untill dinner time and then mix it, or will it loose it's taste?
Hi,
ReplyDeletethanks for leaving comment.
you can Keep ready Pakoda batter and kadhi. Then, half and hour before dinner, simmer kadhi, side by side deep fry pakodas and transfer them hot in boiling kadhi. boil for few minutes. and serve.
If you make pakodas ahead of time, they will become cold and won't be able to soak the kadhi. Hot pakodas soak the kadhi easily.
i am going to do it.i knew that all will enjoy it. i love chakali blogspot because it is in marathi. that's like a talking with a best friend
ReplyDeleteThanks for your comment...
ReplyDeletehii Vaidehi,
ReplyDeletepakodyanmadhe akhhe dhane ghatale ter apratim chav yete
Hello, tumcha blog farach chhan ahe..especially marathi madhun tar greatch.. mazya aai la aata hya blogmule internet varun recipies vachayala avadayala lagala ahe :)
ReplyDeleteThank you Amit
ReplyDeletetraditional white Kadhi chi recipe post keli aahe ka ??
ReplyDelete- Shraddha
Hi Shraddha,
ReplyDeleteTraditional white kadhi chi recipe nahiye blog var, pan mi post karen vel milala ki.
Vaidehi
HI Vaidehi, Just one suggestion kadhi pakode sathi , pakode mug daal bhijvun crush karun trache mug pakode karawe (daal thodi jadsar crush karawi) aani pakode madhe soda nahi ghalayacha, manje pakode kadhi soak karat nahit aani chav pan mast lagate.
ReplyDeleteHi....
ReplyDeleteKhup Chaan Recipe astat tumchya.... sopya ani chaan!! Mi khup padarth tumche blog vachun banavte....