काळ्या वाटाण्याची आमटी - Kala Vatana Amti
Kalya Vatanyachi Amati in English साहित्य: एक कप काळे वाटाणे कांदा-नारळ पेस्टसाठी: १/४ कप खवलेला ओला नारळ, १/२ कप कांदा, उभा चिरून, १ ट...
https://chakali.blogspot.com/2009/01/kalya-vatanyachi-amati.html
Kalya Vatanyachi Amati in English
साहित्य:
एक कप काळे वाटाणे
कांदा-नारळ पेस्टसाठी: १/४ कप खवलेला ओला नारळ, १/२ कप कांदा, उभा चिरून, १ टेस्पून तेल
फोडणीसाठी
२ टेस्पून तेल, १/४ टिस्पून मोहोरी, १/२ टिस्पून जिरे, १/८ टिस्पून हिंग, १/४ टिस्पून हळद, १ टिस्पून लाल तिखट, ४ कढीपत्ता पाने
१/२ कप बारीक चिरलेला कांदा
१ टिस्पून धणेपूड
१ टिस्पून जिरेपूड
३ आमसुलं
१ टिस्पून गूळ
१ टेस्पून काळा मसाला
चवीपुरते मिठ
कृती:
१) काळे वाटाणे ८ ते १० तास भिजवावेत. नंतर पाणी काढून टाकावे आणि मोड येण्यासाठी सुती कापडात गच्चं बांधून ठेवावेत (कमीतकमी १० ते १२ तास).
२) पॅनमध्ये १ टेस्पून तेल गरम करावे. कांदा नीट परतून घ्यावा. कांदा व्यवस्थित शिजला पाहिजे, कच्चा राहू देऊ नये. नंतर नारळ घालून परतून घ्यावे. (टीप) हे मिश्रण थोडे गार झाले कि मिक्सरमध्ये बारीक पेस्ट करून घ्यावी.
३) लहान कूकरमध्ये २ टेस्पून तेल गरम करावे. त्यात मोहोरी, जिरे, हिंग, हळद, आणि कढीपत्ता घालून फोडणी करावी. त्यात भिजवून मोड आलेले वाटाणे घालून एक मिनीटभर परतावे. नंतर त्यात धणेजिरेपूड घालून परतावे. गरजेपुरते पाणी घालावे (साधारण १ ते दिड कप). चवीपुरते मिठ, काळा मसाला आणि आमसुलं घालावीत. मिक्स करून कूकर बंद करावा आणि ५ ते ७ शिट्टया किंवा वाटाणे शिजेपर्यंत शिट्ट्या कराव्यात.
४) कूकर थंड झाला कि उघडावा त्यात कांदा-नारळ पेस्ट घालून उकळी काढावी. आता गुळ घालावा. गरजेनुसार पाणी वाढवावे. चव पाहून तिखट आणि मिठ अड्जस्ट करावे.
हि वाटाण्याची आमटी गरमागरम भाताबरोबर सर्व्ह करावी.
टीप:
१) जर सुके खोबरे वापरायचा असेल तर कांदा परतायच्या आधी सुका नारळ परतावा नंतर कांदा घालावा.
२) काही जणांना कडधान्याची आमटी फोडणीला टाकून प्रेशर कूक करायला आवडत नाही. अशावेळी, आधी प्रेशरकूकरमध्ये फक्त वाटाणे मिठ घालून शिजवून घ्यावेत. आणि नेहमीच्या फोडणीसारखे, कढईत फोडणीस टाकावेत.
३) ताजा खोवलेला नारळ वापरत असाल तर आवडीनुसार जास्त घातला तरी चालेल.
४) सुके खोबरे तेलात चांगले भाजून घेतल्याने त्याचा खमंगपणा या आमटीला छान लागतो. मी ओला नारळ व सुके खोबरे वापरून दोन्ही पद्धतीने आमटी बनवली. ओल्या नारळापेक्षा सुके खोबरे या आमटीत जास्त चांगले लागते, फक्त खोबरे तेलात छान खमंग भाजले गेले पाहिले.
Labels:
Kala Vatana Amati, Vatanyachi Amti, Maharashtrian Amti, Kalya vatanyache sambhar

फारच छान रेसिपी! रश्श्याला रंग छान आलाय.
ReplyDeleteअश्या प्रकारच्या काळे वाटाणे, मसूर वगैरे जिन्नस वापरून केलेल्या पाककृती मध्ये, वाटाणे, मसूर आधी तुपात परतून घेतले तर आमटी जास्त चविष्ट होऊ शकते का?
namaskaar Vaidehi,
ReplyDeleteUSA madhe kale vatane miltat ka? tashi mahiti asel tarr please sanga. dhanyavad.
Deepali
namaskar dipa,
ReplyDeletekale vatane US madhye tumchya jawalil Indian store madhye nakki miltil..
Hi Vaidehi, ur blog is very good, i like it.
ReplyDeleteI did not know cooking at all, but after reading receipes in ur blog i learnt many curries n various dishes. Thanks a lot.
I want to know where do we get Kala masala or can we make it?
Thanks Pallavi for your appreciation
ReplyDeleteIf you are in US, you will get kala masala in any Indian store. If you are in India, in Maharashtra you will get it in any grocery store. I am not sure about other parts of India. If you have any friend or relative in Mumbai or Pune.. You can ask them for Masala.
If you want to make it at home.. I have given a link for the recipe of Kala Masala from Scratch in the list of Ingredients. however, I am giving it below for your convenience. -
Kala Masala
Hi Vaidehi, GM! very nice to see ur reply..
ReplyDeleteYea I'm in US n I'll check in d Indian stores for kala masala n thanks a lot for the link too..
Yea I'll also try to make it at home..
Thanks again, have a nice day..
thanks pallavi..
ReplyDeleteUSA madhe kale vatane kuthech milat nahit. Mhanun me India hun gheun aale 2 kilo :)
ReplyDeletemastach!!
ReplyDeletekhoopach chan recipe
ReplyDeleteGood one i like it. Mast zali aamti ekdam.
ReplyDeleteThanks
ReplyDeleteमी कांद्या खोबारय बरोबर थोडूक्सा खडा मसाला परतवुन सगळयाची पेस्ट करून घेतो
ReplyDeleteसुधाकर
Phodnichya sahityat 1/2 cup barik chiralela kanda ghyavayas sangitala aahe. aani kruti madhe chycha kuthe ullekhach nahi aahe.
ReplyDeleteMi aamti karun pahili. ccchan zali.
अहो डॉक्टर मॅडम लहान कुकरच्या फोडणीच्या कृतीत तो बारीक कांदा वापरावा, आणखी चविष्ट होईल।
Deletekala vatana kuthe milel??? me Aurangabad la rahate
ReplyDeleteKala vatana kirana malachya dukanat milel.
Deletekale vatana kuthe milel???
ReplyDeleteवैदेही धन्यवाद! अतिशय सुंदर रेसिपी दिल्याबद्दल!
ReplyDeleteDhanyavad Gyan
DeleteKhup chan recipe ahe
ReplyDeleteThanks