डाळींबी उसळ - Dalimbi Usal
Dalimbi Usal in English वाढणी: २ जणांसाठी साहित्य: ३/४ कप वाल फोडणीसाठी: १ टेस्पून तेल, १/४ टिस्पून मोहोरी, १/२ टिस्पून जिरे, १/८ ट...
https://chakali.blogspot.com/2008/12/dalimbi-usal.html?m=1
Dalimbi Usal in English
वाढणी: २ जणांसाठी
साहित्य:
३/४ कप वाल
फोडणीसाठी:
१ टेस्पून तेल, १/४ टिस्पून मोहोरी, १/२ टिस्पून जिरे, १/८ टिस्पून हिंग, १/४ टिस्पून हळद, १/२ टिस्पून लाल तिखट
४ कढीपत्ता पाने
२ टेस्पून सुका नारळ
१ टिस्पून जिरे
१ टिस्पून गूळ
२ आमसुलं
१/४ कप कोथिंबीर
२ टेस्पून ओला नारळ
चवीनुसार मिठ
कृती:
१) वाल कोमट पाण्यात १० ते १२ तास भिजत ठेवावे. नंतर पाणी काढून टाकून भिजलेले वाल मोड आणण्यासाठी पंच्यात ८ ते १० तास गच्च बांधून ठेवावे. डाळींब्यांना मोड आले कि कोमट पाण्यात १० मिनीटे टाकून ठेवावे. डाळींब्या सोलून घ्याव्यात. मोड आलेल्या डाळींब्या हाताळताना त्या अख्ख्या राहतील याची काळजी घ्यावी. साधारण सव्वा ते दिड कप डाळींब्या होतील.
२) कढईत किसलेला सुका नारळ मध्यम आचेवर भाजून घ्यावे. नंतर जिरे खरपूस भाजून घ्यावे. नंतर भाजलेला नारळ आणि भाजलेले जिरे निट कुटून घ्यावे.
३) कढईत तेल गरम करावे. त्यात १/४ टिस्पून मोहोरी घालून तडतडू द्यावी. नंतर जिरे, हिंग, हळद, आणि लाल तिखट घालून फोडणी करावी. कढीपत्ता आणि कोथिंबीर घालावी. थोडावेळ परतून डाळींब्या घालाव्यात. हलक्या हाताने परतावे. थोडा पाणी घालावे. १ ते २ टिस्पून कुटलेले जिरे-खोबरे, आमसुलं आणि मिठ घालून वाफ काढावी.
४) डाळींब्या अर्ध्या शिजल्या कि गूळ घालून वाफ काढावी. डाळींब्या खुप नाजुक असतात पटकन मोडल्या जातात म्हणून हलक्या हाताने परतावे.
उसळ तयार झाली कि ओला नारळ घालावा. गरमागरम पोळ्यांबरोबर सर्व्ह करावे.
Labels:
Dalimbyanchi Usal, Valachi Usal, Dalimbi Usal

माझी फेवरीट उसळ!
ReplyDeleteजिरं तर हवंच. वालाचा उग्रपणा त्यामुळे चटकन पळून जातो. अशाच मस्त आणि रोज करण्यासारख्या पाककॄती लिहीत राहा.
माझी फेवरीट उसळ!
ReplyDeleteजिरं तर हवंच. वालाचा उग्रपणा त्यामुळे चटकन पळून जातो. अशाच मस्त आणि रोज करण्यासारख्या पाककॄती लिहीत राहा.
Nothing like Dalimbi usal.
ReplyDeleteसही! मलापण ही उसळ खुप आवडते.
ReplyDeleteHarekrishnaji & khaugiri
ReplyDeletedhanyavad commentsathi
Vaidehi,
ReplyDeleteBhajale sukhe khobare aani jeere kadhi takayche he lihilech nahis!!! :)
Maddy
नमस्कार Maddy,
ReplyDeleteखरंच चुकून राहून गेले लिहायचे, लक्षात आणून दिल्याबद्दल धन्यवाद..दुरूस्ती केली आहे.
hi vaidehi
ReplyDeleteme Belgium madhe rahate. mala hi usal karayachi aahe.Indian shop madhe kaay navane he milele?
thanks in advance.
madhavi
Hi Madhavi,
ReplyDeletevaal mhanun Indian store madhye paha...fakt akkhe vaal ghe.. mhanje valachi daal suddha aste jyat saal kadhun vaal split kelela asto...pan tyala mod kadhta yet nahit... mhanun akkhe vaal ghe
Thanks Vaidehi
ReplyDeleteme check karaen aata indian store madhe ,ani kashi zlai te hi tula sangen
madhavi
thanks madhavi
ReplyDeleteVaidehi,
ReplyDeleteAse mhantat ki Gul ghatlyavar within 2 mins gas band karawa nahitar dalimbya kadak hotot. He khare aahe ka?
Nimisha
Hello Nimisha
ReplyDeleteGul ghatalyane dalimbya shijayla jast vel lagto ani kadak hotat. mhanun dalimbya 50 te 60 % shijalya ki tyat gool ghalava mhanje dalimbya modat nahit.. akkhya rahtat ani kahi minitatach shijtat.
Dear Vaidehi,
ReplyDeleteI loved this recipe. Ur recepies are really good. Explained in the homely language. Thx.
Rajendra
Dhanyavad Rajendra
ReplyDeleteMi Chef aahe. Tu kharach changle kaam karat aahes aplya maharashtrain traditional receipes sambhaloon thevayache aani share karayeche...good initiative..Vaidehi.
ReplyDeleteKind Regards
Bhide Meedhund.
Dhanyavad :)
DeleteHi Viadehi,
ReplyDeleteWe might not get the beans here in UK, what can we substitute it with?
Thanks!
Hello Kanepi
DeleteTry to find it in Indian grocery store. If you dont find vaal beans then substitute it with lima beans. The taste won't be the same. But you will get the nearest taste.
Hello Vaidehi Tai, Mi Shamika..mala asa vatat ki hyat apan ola khobar ani suk khobar ani kanda lasun ala he sarv fry kerun vatlyavar chan taste yete.
ReplyDeleteThanks
हो तशी सुद्धा छान लागते.
DeleteWoow
ReplyDeletePharach chaan zaliye usal.
Vaidehi tula anek nawryanchya khup dua aahet. Thank you so much. :)
haha :noprob: Thank you Asawari..
Deleteही बिरड्याच्या उसळीची पाककृती पाहून मला माहेरची आठवण झाली
ReplyDelete:smile:
DeleteVaidehi Khup chhan zali usal tuzya paddhatine saglyana avadli. thank you so much vaidehi.
Deletevaidehi usal khupach chhan zali sagalyana avadali. thank you very much vaidehi God Bless you.
Delete