चॉकलेट वडी - Chocolate Vadi
Chocolate Vadi ( English Version ) आपण बाजारात मिळणारे चॉकलेट बर्याचदा खातो. हि घरगुती चॉकलेट वडीची कृती.. साहित्य: १/२ कप कोको पावड...
https://chakali.blogspot.com/2008/05/chocolate-vadi.html
Chocolate Vadi (English Version)
आपण बाजारात मिळणारे चॉकलेट बर्याचदा खातो. हि घरगुती चॉकलेट वडीची कृती..
साहित्य:
१/२ कप कोको पावडर
१ कप मिल्क पावडर
१/४ कप लोणी / अनसॉल्टेड बटर
१/२ कप साखर
१/४ कप पाणी
कृती:
१) एका बोलमध्ये कोको पावडर आणि मिल्क पावडर एकत्र करून चाळून घ्यावी.
२) पोळपाटाला लोणी लावून घ्यावे. लाटण्यालासुद्धा लोणी लावून घ्यावे.
३) साखरेचा गोळीबंद पाक करावा. पॅन गॅसवरून उतरवावा लगेच त्यात लोणी घालावे, घोटावे. लगेच मिक्स्ड पावडर घालावी. जोरजोरात घोटत राहावे. पावडरची गोळी राहू देवू नये. याचे घट्टसर तुकतुकीत असे मिश्रण तयार होईल.
४) मिश्रण निवायच्या आत पोळपाटावर पसरावे. लाटण्याने समान लाटावे. १ सेमी उंचीचा थर बनवावा. सुरीने हलक्या हाताने वड्या पाडाव्यात. मिश्रण सुकले कि वड्या वेगवेगळ्या कराव्यात.
सजावटीसाठी काजू तुकडा किंवा बदामाचे काप घालावेत.
टीप:
१) पाक बनवताना, पावडर मिक्स करताना वेळेची काळजी घ्यावी. जर पाक जास्त घट्ट झाला किंवा लोणी कमी पडले तर वड्यांचे मिश्रण मोकळे होते आणि वडी पडत नाही. त्यामुळे सर्व जिन्नस आधीपासून तयार ठेवावे.
२) मिल्क पावडर एकदम पिठासारखी असावी. काही ठिकाणी किंचीत दाणेदार पावडर मिळते. यामुळे वड्यांच्या चवीत फरक पडतो. वड्या थोड्या चरचरीत लागतात.
३) जर वातावरण थंड असेल तर हे मिश्रण पटकन आळते. जर मिश्रण फळफळीत झाले तर थोडा वेळ मिश्रण गॅसवर ठेवावे आणि थोडे लोणी घालावे. चांगल्याप्रकारे घोटून मिक्स करावे व लगेच पोळपाटावर लाटून वड्या पाडाव्यात.
Labels:
Chocolate Wadi, Homemade Chocolate, Chocolate Recipe

Hi!
ReplyDeleteblog is really very nice...blog name chakali is nice but i wonder why there is no chakali receipe in 'Diwali special'.I am just going through your choclate wadi receipe & at the bottom of the receipe i read in instruction word 'phalphalit' pakka marathi shabda.nice to read that word. only few people use such words. i really like you use that word.insted of 'jast patal' or 'olsar' & last but not the least choclate wadi receipe is really. All the best for Your blog writting.
साखरेचा गोळीबंद पाक करताना त्यात पाणी मिसळायचं असतं का? आणि जर हो, तर साखरेच्या किती प्रमाणात पाणी मिसळावं?
ReplyDeleteKoopach chan....Mala Yach Khupach Upypg Honar Ahe...
ReplyDeletethanks shweta for your comment
ReplyDeleteHi Aditi,
ReplyDeleteहो गोळीबंद पाक करताना पाणी मिसळायचे असते. साखर भिजेपर्यंत पाणी घालावे. साधारण ३ भाग साखर असेल तर १ भाग पाणी घालावे.
अच्छा! ठीक आहे. मी पाक करून पाहीन. उत्तरासाठी धन्यवाद!
ReplyDeleteमस्त्च.......ह............करुनच पहाते ...आजच !!!!
ReplyDeletewow!!! very tasty recipe mi lavkarch try karnar ahe !!!!
ReplyDeleteshweta
hey mast jhalyat vadya. kelya nanatar chya 15 mintat samplya pan. sundar chav..
ReplyDeletedhanyavad!!
ReplyDeleteAg Maj mishran patal jala mnun nntr mi freez mde thevla ..praman barobar ghetla hota tri pan ???rply bhagyashree
ReplyDeleteHello Bhagyashri
DeleteBahuda Paak goliband zala nasel. tyamule mishran patal zale asave. pudhchya veli paak nit check kar.
yamadhye coco powder asalyane paak alanyasathi jast vel atavta suddha yet nahi karan coco powder chatkan karapte.
K thanks for rply
ReplyDeleteNice recipe. Please post some other chocolate recipes.
ReplyDeleteHe mishran apan plastic mould madhye pan ghalun chocolate karu shakto ka?
ReplyDeleteHello Sharmila
Deletehe mishran tayar zale ki khup garam aste. plastic mould vitalu shaktat.
ani tumhi je mhantay tase he chocolate naste. texture thode vegle aste tyamule vadyach kelelya barya. kinva try karun pahayche asel tar aluminum mould madhye bharun pahu shakta.
best recipe .
ReplyDeleteThanks
Deletegoliband pak mhnje kay
ReplyDeletegoliband paak mhanje daat paak. ya pakacha themb panyat takla tar to panyat lagech viraghalat nahi ani hatane ekatra jamavlyas tyachi lahanshi goli banate. ya stage la paak tayar zala ki goliband paak zala ase mhantat.
DeleteHi Didi,
ReplyDeletePlease send Simple and Easy Recipe for Chocolate...