Chocolate Fudge

Chocolate Fudge वेळ: १५ मिनीटे वेळ: ५-६ तुकडे साहित्य: १ वाटी चॉकलेटचे तुकडे (कुकिंग चॉकलेट) ३/४ वाटी कंडेन्स मिल्क १ चमचा लोणी १/...

Chocolate Fudge

वेळ: १५ मिनीटे
वेळ: ५-६ तुकडे


साहित्य:
१ वाटी चॉकलेटचे तुकडे (कुकिंग चॉकलेट)
३/४ वाटी कंडेन्स मिल्क
१ चमचा लोणी
१/४ वाटी अक्रोडचे तुकडे
पाव चमचा वॅनिला इसेंस

कृती:
१) मोठ्या पातेल्यात पाणी उकळत ठेवावे. त्यावर बसेल असे दुसरे स्टीलचे भांडे किंवा वाडगे घ्यावे. त्यात चॉकलेट, कंडेन्स मिल्क आणि लोणी घालून मिक्स करावे.
२) सतत ढवळावे. चॉकलेट पूर्ण वितळले की त्यात अक्रोडाचे तुकडे आणि वॅनिला इसेंस घालावा. टीन ट्रेला हलकासा बटरचा हात लावावा. त्यात हे मिश्रण ओतावे.
३) गार होवू द्यावे. थोडावेळ फ्रीजमध्ये सेट करावे. सुरीने कापून फज तयार करावे.

Related

Sweet 2833822549806317060

Post a Comment Default Comments

emo-but-icon

Search Recipes

Like Chakali!

item