कर्ड राईस - Curd Spiced Rice

Curd Rice in English वेळ: १० मिनीटे वाढणी: १-२ साहित्य: २ वाट्या मोकळा भात फोडणीसाठी: २-३ चमचे तेल, पाव चमचा हिंग, पाव चमचा हळद, कढी...

Curd Rice in English

वेळ: १० मिनीटे
वाढणी: १-२


साहित्य:
२ वाट्या मोकळा भात
फोडणीसाठी: २-३ चमचे तेल, पाव चमचा हिंग, पाव चमचा हळद, कढीपत्ता, २-३ हिरव्या मिरच्या
१/४ वाटी मटार, १/४ वाटी गाजर
पाऊण ते १ वाटी दही
चवीपुरते मीठ
कोथिंबीर

कृती:
१) भात आणि दही मिक्स करून घ्यावे. चवीपुरते मीठ घालावे.
२) गाजराचे लहान तुकडे करून घ्यावे.
३) कढईत तेल गरम करून त्यात फोडणी करावी. मटार आणि गाजर फोडणीस टाकावे. मंद आचेवर वाफ काढावी.
४) ही फोडणी एका मोठ्या वाडग्यात काढून ठेवावी. त्यात मिक्स केलेला दहीभात घालावा. नीट मिक्स करावे.

टीप:
१) दही शक्यतो गोडंच असावे.

Related

Rice 6705013399171287947

Post a Comment Default Comments

  1. Hey there is misplaced something you never shows the curd rice recipe..please have a look and upload it as early as possible thanks..!!

    ReplyDelete

emo-but-icon

Search Recipes

Like Chakali!

item