सेसमे हनी टोफू - Sesame Honey Tofu

Sesame Honey Tofu in English वेळ: १५ मिनिटे वाढणी: २ ते ३ जणांसाठी साहित्य: १५० ग्राम टोफू १ टिस्पून भाजलेले तीळ १ मध्यम लाल भोपळी...

Sesame Honey Tofu in English

वेळ: १५ मिनिटे
वाढणी: २ ते ३ जणांसाठी



साहित्य:
१५० ग्राम टोफू
१ टिस्पून भाजलेले तीळ
१ मध्यम लाल भोपळी मिरची
१ लहान कांदा
७-८ लसूण पाकळ्या, बारीक चिरून
१ इंच आलं, उभे पातळ काप (मॅचस्टीकसारखे)
२ हिरव्या मिरच्या
१ टिस्पून मध
दिड टिस्पून सोया सॉस
१/२ टिस्पून व्हिनेगर
चवीपुरते मीठ
तेल

कृती:
१) भोपळी मिरचीचे चौकोनी तुकडे करावे. हिरवी मिरची बारीक चिरून घ्यावी. कांदा उभा पातळ चिरून घ्यावा.
२) टोफुचे मध्यम चौकोनी तुकडे करावे. तव्यावर थोडे तेल घालून टोफू थोडा लालसर करून घ्यावा.
३) कढईत १ चमचा तेल गरम करावे. त्यात लसूण आणि आलं परतावे. नंतर हिरवी मिरची घालावी आणि कांदा परतून घ्यावा. लाल भोपळी मिरची थोडीशी परतावी.
४) सोया सॉस घालून मिक्स करावे. लगेच फ्राईड टोफू घालून मिक्स करावे.
५) चवीपुरते मीठ आणि व्हिनेगर घालावे. मिक्स करून आच बंद करावी
६) भाजलेले तीळ गरजेनुसार मिक्स करावे. मध घालून हलकेच मिक्स करावे.
गरमच सर्व्ह करावे.

Related

Tofu 7128945955088458874

Post a Comment Default Comments

emo-but-icon

Search Recipes

Like Chakali!

item