चीज पिज करी - Cheese Matar Curry

Cheese Peas Curry in English वेळ: २० मिनिटे (ब्राऊन ग्रेव्ही तयार असल्यास) वाढणी: ४ जणांसाठी साहित्य: १ कप वाफवलेले मटार २ चीज क्य...

Cheese Peas Curry in English

वेळ: २० मिनिटे (ब्राऊन ग्रेव्ही तयार असल्यास)
वाढणी: ४ जणांसाठी


साहित्य:
१ कप वाफवलेले मटार
२ चीज क्युब्ज, लहान तुकडे
३ टेस्पून तेल
३ टेस्पून कांदा, बारीक चिरून
१/२ कप टॉमेटो, बारीक चिरून
३/४ कप ब्राऊन ग्रेव्ही (आधी तयार करून ठेवावी)
१/२ कप काजू-मगजबी पेस्ट (आधी तयार करून ठेवावी) (टीप २ पहा)
दिड टिस्पून लसूण पेस्ट
१/२ टिस्पून आले पेस्ट
१ टिस्पून गरम मसाला
२ टेस्पून खवा किंवा १ टेस्पून मिल्क पावडर
१/२ टिस्पून लाल तिखट
१/३ कप पाणी
२ टिस्पून बटर
चवीपुरते मीठ

कृती:
काजू-मगजबी पेस्ट करण्यासाठी १/४ कप काजू आणि १/४ कप मगजबी पाण्यात घालून उकळवावे. नंतर पाणी काढून टाकावे आणि बारीक पेस्ट करावी.

१) कढईत तेल गरम करावे. त्यात कांदा लालसर होईस्तोवर परतावा. नंतर आले-लसूण पेस्ट परतावी. टॉमेटो घालून एकदम मेण होईस्तोवर परतावा.
२) वाफवलेले मटार घालून मिक्स करावे. १-२ मिनिटे परतून ब्राऊन ग्रेव्ही, काजू पेस्ट आणि गरजेपुरते पाणी घालावे. मंद आचेवर ५ मिनिटे शिजू द्यावे.
३) गरम मसाला, खवा, लाल तिखट, बटर, आणि मीठ घालावे. मंद आचेवर ४-५ मिनिटे शिजवावे. सर्व्ह करताना चीजचे बारीक तुकडे घालून मिक्स करावे. लगेच सर्व्ह करावे.

टीप:
१) काजू पेस्ट भाजीला छान क्रिमी टेस्ट येते. पण आवडत असेल तरी २-३ टेस्पून क्रीम सर्व्ह करताना घालू शकतो.
२) मगज बी म्हणजेच कलिंगडाच्या बिया. या बिया सुकवून आतील पांढरा भाग वापरला जातो. सोललेल्या बिया किराणा मालाच्या दुकानात सहज मिळतात.

Related

Peas 8227133498283083445

Post a Comment Default Comments

  1. Hi dii your all receipe .... fabulous ... and easy to understand ..... ... my husband .... say me .... shweta ... u r such good cook .... its secret .... bcoz of you ...... please .... One request .... add diet receipy also ... m waiting ... plz ... fast

    ReplyDelete
  2. What is brown gravy??

    ReplyDelete
  3. Looks yum, would like to try this.

    khava nasel tar chavit farak padato ka? and can we avoid nuts?

    Thanks.

    ReplyDelete
    Replies
    1. Khava ani nuts yamulech gravy la chhan taste and texture yeta. Tumhala vatat asalyas khavya aivaji thodi milk powder ghalu shakta.

      Delete
  4. How big are the cheese cubes? Can you please add approximate quantity?

    ReplyDelete

emo-but-icon

Search Recipes

Like Chakali!

item