Toorichi Usal

Toorichi Usal वेळ: २५ मिनिटे वाढणी: २ ते ३ जणांसाठी साहित्य: १ कप तुरीचे ताजे दाणे फोडणीसाठी: २ टीस्पून तेल, १/८ टिस्पून मोहोरी, १/...

Toorichi Usal

वेळ: २५ मिनिटे
वाढणी: २ ते ३ जणांसाठी


साहित्य:
१ कप तुरीचे ताजे दाणे
फोडणीसाठी:
२ टीस्पून तेल, १/८ टिस्पून मोहोरी, १/८ टिस्पून हिंग, १/४ टिस्पून हळद, १/२ टिस्पून लाल तिखट, ३-४ कढीपत्ता पाने
१ मध्यम कांदा, बारीक चिरून
१ मध्यम बटाटा, सोलून मध्यम फोडी (ऐच्छिक)
१/२ टिस्पून गोडा मसाला
१/४ कप ओलं खोबरं
२ टिस्पून गूळ
चवीनुसार मीठ

कृती:
१) कढईत तेल गरम करावे. त्यात मोहोरी, हिंग, हळद, लाल तिखट आणि कढीपत्ता घालून फोडणी करावी.
२) कांदा फोडणीस घालावा. कांदा थोडा परतला की बटाटा, तुरीचे दाणे आणि मीठ घालावे. वर पाण्याचे झाकण ठेवून मंद आचेवर शिजू द्यावे.
३) दाणे आणि बटाटा शिजला की ओलं खोबरं, गूळ आणि गोड मसाला घालावा. थोडा रस हवा असल्यास ताटलीत उरलेले गरम पाणी गरजेनुसार घालावे. उकळी काढावी.
गरमा गरम उसळ सर्व्ह करावी.

Related

Usal 3940300806219445870

Post a Comment Default Comments

  1. hii, receipe khup chan aahe aani photo pahun tar khavesech vatatay. Pan Turiche dane mhanaje kay? aani te kuthe miltat? te matarchya danyasarkhe distat ka?

    Archana

    ReplyDelete

emo-but-icon

Search Recipes

Like Chakali!

item