हरभऱ्याच्या पाल्याची भाजी - Harbhara palyachi bhaji

Harbhara Leaves Sabzi in English हरभऱ्याचा कोवळा पाला वापरून ही पालेभाजी बनवता येते. पाल्याला सोलाणे (हिरवे ओले चणे) धरले कि तो पाला जुन ह...

Harbhara Leaves Sabzi in English

हरभऱ्याचा कोवळा पाला वापरून ही पालेभाजी बनवता येते. पाल्याला सोलाणे (हिरवे ओले चणे) धरले कि तो पाला जुन होतो आणि भाजी करण्यास अयोग्य होतो. त्यामुळे सोलाणे भरायच्या आधीचा पाला मिळाल्यास पुढील रेसिपी बनवता येईल.

साहित्य:
२ कप हरभऱ्याचा कोवळा पाला
१/२ वाटी मटार (ऐच्छिक)
१ टेस्पून तेल, १/८ टिस्पून मोहोरी, १/४ टिस्पून हिंग, १/४ टिस्पून हळद
४ लसूण पाकळ्या
२ हिरव्या मिरच्या तुकडे करून
१ टेस्पून ओला नारळ
चवीपुरते मीठ
१/४ चमचा साखर

कृती:
१) हरभऱ्याचा पाला स्वच्छ धुवून बारीक चिरून घ्यावा. कढईत तेल गरम करून त्यात लसणीच्या ठेचलेल्या पाकळ्या घालाव्यात. लसूण लालसर झाली कि मोहोरी, हिंग, हळद, मिरच्या घालून फोडणी करावी. त्यात मटार घालावेत.
२) आच मंद करून कढईवर झाकण ठेवून मटार अर्धवट शिजू द्यावे. नंतर चिरलेला पाला घालून मध्यम आचेवर भाजी परतावी.
३) भाजी आळली कि नारळ मीठ आणि साखर घालावी.

टीप:
१) या भाजीमध्ये मटार ऐच्छिक आहेत. नुसत्या पाल्याचीसुद्धा भाजी छान लागते.
२) भाजीमध्ये लसूण नक्की घालावे.
३) भाजी कोरडी हवी असल्यास २-३ चमचे भाजलेले बेसन पीठ किंवा थालीपीठ भाजणी घालावी.

Related

Winter 6182947025970188512

Post a Comment Default Comments

  1. I live in the US. Hi palebhaji kuthe milel? Ethe local store madhe milate ka? Ka Indian store madhe?

    ReplyDelete
  2. Hi वैदेही,
    आज ही भाजी केली होती, पहिल्यांदाच.... आणि घरातल्या सर्वांना खूप आवडली... Thank you so much for the receipe. तुझ्या पद्धतीने केलेला आलेपाकही मस्त झाला होता☺

    ReplyDelete

emo-but-icon

Search Recipes

Like Chakali!

item