शेवयांचा शिरा - Sevai Sheera

Sevai Sheera in English वेळ: १५-२० मिनिटे वाढणी: ३ ते ४ जणांसाठी साहित्य: २ कप बारीक शेवया २ कप दूध (गरम) (थोडे जास्त लागू शकेल) ...

Sevai Sheera in English

वेळ: १५-२० मिनिटे
वाढणी: ३ ते ४ जणांसाठी


साहित्य:
२ कप बारीक शेवया
२ कप दूध (गरम) (थोडे जास्त लागू शकेल)
१ कप साखर
दीड टेस्पून तूप
२ ते ३ टेस्पून काजू पिस्त्याचे काप
१/२ टिस्पून वेलची पूड
१ चिमटी केशर

कृती:
१) जाड बुडाच्या कढईत तूप गरम करावे. त्यात आधी काजू पिस्ता फिकट रंगावर तळून घ्यावा. नंतर बाजूला काढून ठेवावा.
२) त्याच तुपात शेवया मंद आचेवर खमंग भाजून घ्याव्यात. भाजताना सारखे ढवळावे. कारण शेवया पटकन जळतात.
३) शेवया भाजल्या कि त्यात ३ वाट्या गरम दूध घालावे. झाकून शेवया शिजू द्याव्यात. १-२ मिनिटांनी ढवळून पहावे. लागल्यास अजून थोडे गरम दूध घालावे. ढवळून वाफ काढावी.
४) शेवया व्यवस्थित शिजल्या कि साखर घालावी. मिक्स करून झाकण ठेवून १-२ वाफा काढाव्यात. मिश्रण आळल्यावर वेलची पूड, केशर आणि तळलेले काप घालावे. अधिक स्वादासाठी चमचाभर तूप सोडावे.
हा शिरा अगदी मिनिटभर निवू द्यावा. साखर वितळलेली आणि गरम असल्याने लगेच खाल्ल्यास तोंड पोळू शकते.

टीपा:
१) दुधाऐवजी पाणी किंवा निम्मे दूध आणि निम्मे पाणी असेही घेउ शकतो.
२) शेवया व्यवस्थित भाजल्या गेल्या पाहिजेत नाहीतर नंतर कच्च्या राहतात.
३) शेवया पूर्ण शिजल्यावरच साखर घालावी. एकदा साखर घातली कि बदल करता येत नाही.
४) साखर घातल्यावर खूप वेळ शिजवत ठेवू नये, साखरेचा पाक जास्त आटतो आणि शेवया कडकडीत होतात.

Related

Snack 8779295650400924976

Post a Comment Default Comments

emo-but-icon

Search Recipes

Like Chakali!

item