रश्श्यातल्या कोथिंबीरवड्या - Rassa ani kothimbir wadi

Rassa and Kothimbir wadi in English वेळ: ३५ मिनिटे वाढणी: २ ते ३ जणांसाठी साहित्य: कोथिंबीरवडीसाठी::: २ कप कोथिंबीर १/२ ते ३/४ कप...

Rassa and Kothimbir wadi in English

वेळ: ३५ मिनिटे
वाढणी: २ ते ३ जणांसाठी


साहित्य:
कोथिंबीरवडीसाठी:::
२ कप कोथिंबीर
१/२ ते ३/४ कप बेसन (मी निम्मे बेसन आणि निम्मे ज्वारीचे पीठ वापरले)
३/४ ते १ कप पाणी
१ टिस्पून तांदूळ पीठ
४ ते ५ लसूण पाकळ्या, बारीक चिरून
१/४ इंच आलं, किसलेले,
२-३ हिरव्या मिरच्या
१/४ टिस्पून हळद
१/२ टिस्पून जीरे
१ टेस्पून तेल
चवीपुरते मीठ
कटासाठी:::
१/२ कप किसलेलं सुकं खोबरं
१ टिस्पून किसलेले लसूण
१/२ टिस्पून किसलेलं आलं
१ टिस्पून लाल तिखट
१/४ टिस्पून जीरे, १/४ टिस्पून हिंग, १/४ टिस्पून हळद
१/२ टिस्पून आमचूर पावडर
२ टेस्पून कोथिंबीर, बारीक चिरून
२ टेस्पून तेल
चवीपुरते मिठ

कृती:
कोथिंबीर वडी
१) बेसन, पाणी आणि तांदुळाचे पीठ एकत्र करावे. पाणी घालून गुठळ्या न होता पीठ भिजवावे. चवीपुरते मीठही घालावे.
२) कढईत तेल गरम करावे. त्यात जीरे, हळद आणि वाटलेले आले-लसूण-मिरची घालून १/२ मिनिट परतावे. नंतर त्यात चिरलेली कोथिंबीर घालून कोमेजेस्तोवर परतावी. आच मध्यम करून त्यात भिजवलेले पीठ घालावे आणि ढवळत राहावे. ज्यामुळे गुठळ्या होणार नाहीत.
३) मिश्रण घट्ट होईस्तोवर मंद आचेवर वाफ काढावी. मधेमधे तळापासून ढवळावे म्हणजे पीठ तळाला लागणार नाही.
४) ताटाला तेल लावून घट्ट झालेले पीठ त्यावर थापावे. थंड झाल्यावर वड्या पाडाव्यात.
वड्या शालो फ्राय किंवा डीप फ्राय कराव्यात. (शालो फ्राय केल्यास चांगले कारण बाहेरून छान कुरकुरीत होतात.)
१) किसलेले खोबरे लालसर भाजावे. नंतर भाजलेले खोबरे, आले, लसूण, कोथिंबीर मिक्सरमध्ये बारीक वाटावे.
२) कढईत तेल गरम करून त्यात जीरे, हिंग, हळद आणि लाल तिखट फोडणी करावी. त्यात वाटलेला मसाला घालावा. २-३ मिनिटे मसाला परतावा. साधारण दीड कप पाणी घालून ४-५ मिनिटे मध्यम आचेवर उकळवावे.
३) मीठ आणि आमचूर पावडर घालावी. नंतर कोथिंबीर वडी घालून मिनिटभर मुरू द्यावे. लगेच सर्व्ह करावे

टीप:
१) सर्व्ह करताना रस्सा आणि कोथिंबीर वडी सेपरेटही वाढू शकतो. कारण वडी घालून रस्सा मिनिटभर उकळला की त्याचा कुरकुरीतपणा जातो. सेपरेट वाढल्यास आयत्यावेळी वडी रश्श्यात बुडवून घेता येईल.

Related

Rassa Bhaji 739176361591967943

Post a Comment Default Comments

  1. wow. interested.....
    Mi nakki karun Baghen.
    Thanks vaidehi Tai.

    ReplyDelete
  2. Nice new layout.. ani chaan recipe .. :)

    -Rupal

    ReplyDelete
  3. vaidehitai, ha look chan ahe ga blog cha. recipe tar kay, zakkasach astat. mi ya vadya karte. pan rasshyatlya nahi kelya ajun. ata karen. chanach lagtil. shivay sadhya mumbait hi exclusive dish ahe. karan kothimbir 80 te 100 rs. eka gaddila. ;)

    ReplyDelete
  4. Vaidehi,waaf kadhatana zaakan thewayache na?

    ReplyDelete
  5. Navin blog madhe receipe calender kase pahayache

    ReplyDelete
    Replies
    1. Varti Left side la calender chi link post keleli ahe.

      Delete
  6. navin blog madhe ekhadi recipe PDF madhe save kashi karaychi junya blog madhe print option var click kelel ka hot hoti pan ethe nai hot ata ka bar...

    ReplyDelete
    Replies
    1. Namaskar
      PDF madhye save karaychi soy ahe. Recipe chya khali share ase red button ahe tyavar courser nelyas 'more' ha second last option disel. tithe click kelyavar PDF madhye save karta yeil.

      Delete
  7. Vaidehi - New to your blog and I have to say, lovely recipes! I am a Bengali from Maharashtra and love Maharashtrian food since childhood. So, I am salivating on all your mouthwatering recipes. Thank you!

    I tried this Kothimbir wadi recipe the other day and it was Amazing! Thanks much.

    ReplyDelete
  8. Hi Vaidehi, very tasty recipe!

    ReplyDelete

emo-but-icon

Search Recipes

Like Chakali!

item