सीताफळाचा मिल्कशेक - Custard Apple Milkshake

Custard Apple Milkshake in English वेळ: १५ मिनिटे वाढणी: २ जणांसाठी साहित्य: ५ मोठी सीताफळे, पूर्ण पिकलेली (टीप २ नक्की वाचा) थंड ...

Custard Apple Milkshake in English

वेळ: १५ मिनिटे
वाढणी: २ जणांसाठी


साहित्य:
५ मोठी सीताफळे, पूर्ण पिकलेली (टीप २ नक्की वाचा)
थंड दूध (साधारण दीड ते दोन कप)
४ टेस्पून साखर
१/२ कप वॅनिला आईसक्रिम

कृती:
१) ४ सीताफळाच्या आतील गर काढावा. बिया काढून टाकाव्यात. उरलेल्या एका सीताफळाचा गर काढून वेगळ्या वाडग्यात ठेवावा. हा गर मिक्सरमध्ये वाटू नये.
२) जर ४ सीताफळांचा १ कप गर निघाला तर दीड ते दोन कप दूध आणि ४ चमचे साखर घालून मिक्सरमध्ये ब्लेंड करावे. नंतर वॅनिला आईसक्रिम घालून परत मिक्सरमध्ये फिरवावे. यामुळे मिल्कशेकला थोडा दाटपणा येईल. सर्व्ह करताना बाजूला काढलेला सीताफळाचा गर मिक्स करावा.
लगेच सर्व्ह करावे.

टीपा:
१) दुधाचे प्रमाण कमी जास्त करू शकतो.
२) जर सीताफळाचे लहान तुकडे मिल्कशेकमध्ये हवे असल्यास एका सीताफळाचा गर नुसता काढून मिल्कशेक सर्व्ह करताना त्यात मिक्स करावे.
३) वॅनिला आईसक्रिम ऐच्छिक आहे. नको असल्यास घालू नये. पण आईसक्रिममुळे दाटपणा येतो आणि मिल्कशेक क्रिमीसुद्धा लागतो.

Related

Milkshake 7710306932185980569

Post a Comment Default Comments

  1. Looks delicious! Sadly we don't get custard apple here in the US.

    Btw the new look of your blog is too much like a commercial website... would like it if it looked more like a blog.

    - A long time follower

    ReplyDelete
    Replies
    1. Thanks Naina for your comment.
      yes I want to add more and more features which is giving impression of blog getting commercial. At the same time if you have observed we have decreased ad spots to enhance user experience but personal touch etc will remain as a blog. :smile:

      Delete

emo-but-icon

Search Recipes

Like Chakali!

item