तवा सब्झी - Tawa Sabzi

Tawa Sabzi in English वेळ: ४५ मिनिटे वाढणी: ४ जणांसाठी साहित्य: १०० ग्राम पनीर १ मोठा बटाटा, २ कांदे, १०-१२ फ्लॉवरचे तुरे, १०-१२ भें...

Tawa Sabzi in English

वेळ: ४५ मिनिटे
वाढणी: ४ जणांसाठी

साहित्य:
१०० ग्राम पनीर
१ मोठा बटाटा, २ कांदे, १०-१२ फ्लॉवरचे तुरे, १०-१२ भेंडी, ४-५ मश्रुम्स, १ भोपळी मिरची
तळण्यासाठी तेल
६ टॉमेटो
२ टेस्पून लोणी
२ टेस्पून तेल
२ टेस्पून लसूण, बारीक चिरलेली
१ टेस्पून आले
५-६ बदामाची पूड
१ टिस्पून गरम मसाला
दीड टिस्पून धणेपूड
१/२ टिस्पून जिरेपूड
१/२ टिस्पून आमचूर पावडर
१ टिस्पून लाल तिखट
१ टिस्पून कसुरी मेथी
३ टेस्पून फेटलेली साय
चवीपुरते मिठ
चवीपुरती साखर

कृती:
१) बटाटा सोलून मध्यम चौकोनी तुकडे करावेत. कांद्याच्या मोठ्या फोडी कराव्यात. भेंडीचे देठ कापून टाकावे. भोपळी मिरचीचे मोठे तुकडे करावेत. पनीरचे मध्यम तुकडे करावेत. मश्रुम्सच्या दांड्या काढून टाकाव्यात.
२) एका वाटीत गरम मसाला, धनेजीरे पूड, आमचूर पावडर एकत्र करावी.
३) कढईत तेल गरम करावे. त्यात मध्यम आचेवर चिरलेल्या भाज्या वेगवेगळया तळून घ्याव्यात. कागदावर काढून अधिकचे तेल काढून टाकावे. प्रत्येक भाजीवर चिमटी-चिमटी मसाल्याचे मिश्रण पेरावे आणि मिक्स करावे. पनीर ताजे असल्यास तसेच वापरावे किंवा शालो फ्राय करावे.
४) टॉमेटो उकडून मिक्सरमध्ये बारीक प्युरी करावी. साले व बिया काढण्यासाठी चाळणीवर चाळून घ्यावे. थोडे पाणी घालावे.
५) कढई गरम करून त्यात २ टेस्पून तेल आणि बटर घालावे. त्यात आलेलसूण परतून घ्यावी. त्यात टॉमेटो प्युरी घालून २-४ मिनिटे उकळू द्यावी. लागल्यास थोडे पाणी घालावे. नंतर त्यात बदामाची पूड, उरलेले मसाला मिश्रण, लाल तिखट, कसूरी मेथी, साय, थोडीशी साखर आणि मिठ घालावे. ग्रेव्हीला तेल सुटले पाहिजे.
६) तवा सब्झी बनवताना आवडेल त्या भाज्या तव्यावर घालाव्यात. त्यात २-४ टेस्पून ग्रेव्ही घालून परतावे. वाटल्यास थोडा गरम मसाला आणि धणेपूड घालू शकतो ज्यामुळे अधिक स्वादिष्ट लागेल.

टीपा:
१) यामध्ये आवडतील त्या भाज्या वापरू शकतो. उदा. वांगे, बेबी कॉर्न, रताळे, अळकुडी (अरबी) इत्यादी.
२) जर सर्व प्रकारच्या भाज्या आवडत असतील तर ग्रेव्ही आणि तळलेल्या सर्व  भाज्या एकत्र करून तव्यावर किंवा शालो पॅनमध्ये परतावे आणि गरजेनुसार सुकवावे.

Nutritional Info: (per serving) (Considering 4 Servings)
Calories: 470
| Carbs: 21 g | Fat: 42 g | Protein: 9 g | Sat. Fat: 6  g | Sugar: 7 g

Related

Party 8216932298285141255

Post a Comment Default Comments

  1. Hello vaidehi, in older post or newer post link, there are many many adsense advertisement. and no proper way to go other post. Yes I know it is for more adsense revenue. but did you observed that number of viewed pages get slow down. we readers will be most happy if we can get content easily with ads. other thing you are displaying notice that blog is under renovation from few months... now it is from few years..I think you got what i want to say. your blog is beautiful, i am regular reader from long time..best wishes. thanks

    ReplyDelete
  2. Dear reader,

    I understand the disturbing ads layout on some of the pages. I am working towards very clean design. It is taking a lot longer than anticipated as we have around 600+ recipe pages. I have to also balance the technical work on the blog and recipes/cooking (non tech work).

    The good news is the notice will be gone in next 2-3 months and chakali will have new look as we are in final stages of finalizing the design.

    Thank you for letting me know your candid feedback and thanks for your support and love for chakali.

    ReplyDelete
  3. tangy flavors, awesome taste even with lesser butter, cream n oil..loved it...

    ReplyDelete

emo-but-icon

Search Recipes

Like Chakali!

item