कैरी मिरचीचे लोणचे - Mango Chili Pickle

Chili-Mango instant pickle in English वेळ: १५ मिनिटे दीड कप चटणी (लोणचे) साहित्य: १ कप किसलेली कैरी १ कप मिरच्यांचे तुकडे १ टिस्पून ...

Chili-Mango instant pickle in English

वेळ: १५ मिनिटे
दीड कप चटणी (लोणचे)

साहित्य:
१ कप किसलेली कैरी
१ कप मिरच्यांचे तुकडे
१ टिस्पून मिठ किंवा चवीनुसार
२ टेस्पून तेल
१/२ टिस्पून मोहोरी
१ टिस्पून मोहोरीची डाळ
१/२ टिस्पून हिंग
१/४ चमचा हळद

कृती:
१) कैरी सोलून किसावी.
२) मिरच्या भरडसर वाटाव्यात. पेस्ट करू नयेत शक्य असतील तेवढ्या भरड ठेवाव्यात. किसलेल्या कैरीमध्ये घालून मिक्स करावे.
३) कढल्यात तेल गरम करून त्यात मोहोरी, हिंग, हळद घालावी. फोडणी वाटीत काढून ठेवावी. या फोडणीत १५-२० सेकंदानी मोहोरीची डाळ घालावी, म्हणजे ती जळत नाही. फोडणी गार झाली की कैरी-मिरचीच्या मिश्रणात घालावी. गरजेनुसार मिठ घालून मिक्स करावे.
तयार चटणी प्लास्टिकच्या बरणी भरून फ्रीजमध्ये ठेवावी.

टीपा:
१) जर कैरीला आंबटपणा कमी असेल तर मिरच्यांचे प्रमाण कमी करावे.
२) मिरची आणि कैरीचा किस यांचे प्रमाण आवडीनुसार कमीजास्त करू शकतो.
३) या चटणीत सध्या मिठाऐवजी जाडे मिठ मिक्सरमध्ये बारीक करून वापरावे, चव जास्त छान येते.

Nutritional Info:
Calories: 481| Carbs: 57 g | Fat: 29 g | Protein: 6 g | Sat. Fat: 2 g | Sugar: 13 g

Related

Travel 4194490128595878626

Post a Comment Default Comments

  1. Chhanach ahe. Hya recipe madhe tumhi Mohori waaparilt,tee mohori dal ahe ki aapli fodnichi mohori?

    ReplyDelete
  2. Donhi vaparle ahe. akhkhi mohori ani mohorichi daal

    ReplyDelete
  3. Hi Vaidehi, Mala tula Veel Ammavashe saathe chi ek receipe send karachi aahe kashi karu. Recipe che Name
    Aaahe Bhajiie.Do you have any idea about this recipe.

    ReplyDelete
  4. Hell Vahidehi, Mala tula veel Ammavase chi recipe pathwachi aahe Name aahe " Bahjii"

    ReplyDelete
    Replies
    1. हेलो सीमा
      रेसिपी chakalionline@gmail.com या इमेल आयडी वर पाठव.

      Delete

emo-but-icon

Search Recipes

Like Chakali!

item