व्हेजिटेबल क्लियर सूप - Vegetable Clear Soup

Veg Clear Soup in English वेळ: पूर्वतयारी: १० मिनिटे | कुकिंग टाईम: १०मिनिटे वाढणी: ४ जणांसाठी साहित्य: ६ कप व्हेजिटेबल स्टॉक ४ बेबी क...


वेळ: पूर्वतयारी: १० मिनिटे | कुकिंग टाईम: १०मिनिटे
वाढणी: ४ जणांसाठी

साहित्य:
६ कप व्हेजिटेबल स्टॉक
४ बेबी कॉर्न, थोडे जाडसर तिरके काप
१ मध्यम गाजर, पातळ तिरके काप
१ लहान भोपळी मिरची, चिरलेली (१ सेमीचे तुकडे)
६ मश्रुम्स, उभे मध्यम काप
१/४ काप कोबी, बारीक चिरून (१ सेमीचे तुकडे)
१ टीस्पून तेल
४-६ लसूण पाकळ्या, बारीक चिरून
२ टीस्पून लिंबाचा रस
चवीपुरते मीठ
३ चिमटी मिरपूड
२ टेस्पून पातीकांद्याची पात

कृती:
१) कढईत तेल गरम करून त्यात मध्यम आचेवर लसूण परतावे. गाजर आणि बेबी कॉर्न घालून मोठ्या आचेवर मिनिटभर परतावे. नंतर भोपळी मिरची, मश्रुम्स आणि मीठ घालावे. ३०-४० सेकंद परतावे.
२) व्हेजिटेबल स्टॉक घालून ३-४ मिनिटे उकळावे. शेवटी कोबी घालावी. मिरपूड, लिंबाचा रस आणि आवश्यक असल्यास मीठ घालावे. ढवळून सर्व्ह करावे. सर्व्ह करताना पाती कांद्याने सजवून द्यावे.

टीपा:
१) तेल वापरल्याने सूपवर तेलाचा पातळ तवंग दिसतो. ते टाळायचे असल्यास तेल वापरू नये. भाज्या व्हेजिटेबल स्टॉकमध्ये उकळवाव्यात.
२) जर व्हेजिटेबल स्टॉक नसेल तर नुसते पाणी वापरावे. चवीसाठी १/२ क्युब मॅगी मॅजिक मसाला वापरावा. यामुळे चव छान येते.

Related

Winter 3096096998104491902

Post a Comment Default Comments

  1. Vaidihi ..

    Namskar! tumchya chakali blogsmule mala cooking madhe khup help milali aahe...mala cookingmadhe ajibat interest navhata.. parantu, keval tumchya hya mahitipurn blogsmule mi khup kahi dishes banvinyat shikale aahe.

    khup khup dhanywad!

    Rewti!

    ReplyDelete
  2. Hi Vaidehi,

    Pl share aalu chips, tandula-chya aani gahu-chya kuradyanchi recipe.

    ReplyDelete
  3. Hi Vaidehi,
    mala paneer masala bhurji chi recipe baddal mahiti havi hoti. jar tumhi aadhi post keli asel tar krupaya tase mala reply kara. kinva shakya asel tenvha please post kara.
    Thank You.

    ReplyDelete
  4. Hi Vaidehi,

    Mala dudhi bhopalyache soup karayacha ahe.. tyachi recipe upload karshil ka?

    Thanks
    Vrushali

    ReplyDelete
  5. Plz tell me how to make vegetable stock

    ReplyDelete
  6. Thank you didi for nice recipes

    ReplyDelete

emo-but-icon

Search Recipes

Like Chakali!

item