कढीपत्ता चटणी - kadhipatta chutney

Curryleaves chutney in English वेळ: १० मिनिटे साधारण ३/४ कप चटणी साहित्य: १ टेस्पून तेल १ कप कढीपत्ता पाने १/४ कप सुकं खोबरं (किसलेल...

Curryleaves chutney in English

वेळ: १० मिनिटे
साधारण ३/४ कप चटणी

साहित्य:
१ टेस्पून तेल
१ कप कढीपत्ता पाने
१/४ कप सुकं खोबरं (किसलेले आणि भाजलेले)
२ टीस्पून लाल तिखट
१ टीस्पून गूळ किंवा साखर
चवीपुरते मीठ

कृती:
१) तेल गरम करून त्यात कढीपत्त्याची पाने परतावीत. आच मंद ठेवावी. कढीपत्ता कुरकुरीत होईस्तोवर परतावे.
२) आता भाजलेले खोबरे घालून थोडावेळ मंद आचेवर परतावे. आच बंद करावी.
३) मिश्रण थंड होवू द्यावे. त्यात लाल तिखट, गूळ/ साखर आणि थोडे मीठ घालून मिक्सरमध्ये भरडसर बारीक करावे.

टीप:
१) चटणीत १ टीस्पून भाजलेले तीळ, १/४ चमचा जिरे घातले तरी चालेल. थोडी आंबट चव हवी असल्यास थोडी आमचूर पावडर घालावी.

Related

Travel 42488048165641539

Post a Comment Default Comments

  1. Masta aahe recipe.. Will try... :-)

    ReplyDelete
  2. Akddam sopi aani chavdaar !My 1st comment in my life.

    ReplyDelete
  3. Khoop chhan ani sopi aahe recipe.. pan he chutney kiti divas tikate..

    ReplyDelete
    Replies
    1. Dhanyavad. hi chutney sadharan mahinabhar sahaj tikate.

      Delete
  4. masst ani tasty zale ladu....

    ReplyDelete
  5. Mast aahet tumacha receipy. Tyamule mi swapak shikale

    ReplyDelete
  6. Mi try kelie aaj awadali saglyanna

    ReplyDelete
  7. Punyat aslyapasun "chakali" var nehmi jayche. Pan Melbourne madhe sarkha aaila phone karun recipe magta yet nahi ani tyat chakali var recipe milte. Melbourne la Marathi karayla vel nai lagnar! Thanks! 😊

    ReplyDelete

emo-but-icon

Search Recipes

Like Chakali!

item